आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 07:10 IST2025-08-05T06:55:31+5:302025-08-05T07:10:24+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 05 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ

आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ

मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात त्रास संभवतो. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. संततीशी मतभेद संभवतात. शक्यतो महत्वाचे निर्णय न घेणे हितावह राहील. आणखी वाचा 

वृषभ: मित्र व स्वकीयांसह हिंडण्या-फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपारनंतर मात्र प्रकृतीस काही त्रास संभवतो. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा 

मिथुन:  आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. शत्रूवर विजय मिळवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळू शकेल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे संयमित राहावे लागेल. धन व कीर्ती हानी संभवते. संतती संबंधी एखादी काळजी निर्माण होईल. बौद्धिक वाद संभवतात. आर्थिक नियोजनासाठी मात्र दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. दुपारनंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल. त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आणखी वाचा 

तूळ: कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. कुटुंबियांना आपल्यामुळे काही त्रास होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आपण तयार व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपारनंतर कुटुंबात गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च संभवतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपारनंतर मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संततीकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आनंदित व्हाल. दुपारनंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते.  आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान-सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. संततीच्या प्रगतीने सुखावून जाल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आणखी वाचा 

मीन: बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील. हाती घेतलेले कार्य विना अडथळा पूर्ण करू शकाल. धनलाभ संभवतो. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 05 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app