आजचे राशीभविष्य: ९ राशींना सकारात्मक दिवस, धनलक्ष्मी प्रसन्न राहील; कामात यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 07:16 IST2024-01-04T07:13:37+5:302024-01-04T07:16:15+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 04 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: ९ राशींना सकारात्मक दिवस, धनलक्ष्मी प्रसन्न राहील; कामात यश मिळेल

आजचे राशीभविष्य: ९ राशींना सकारात्मक दिवस, धनलक्ष्मी प्रसन्न राहील; कामात यश मिळेल

मेष: विविध प्रकारच्या कामात व्यस्त राहाल, कामांची यादी करून प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार शांत चित्ताने कामे करा. त्यामुळे तुमची महत्त्वाची कामे राहून जाणार नाहीत. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. प्रवास करावा लागेल. थोडी दगदग होईल.

वृषभ: ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. मात्र, बेफिकीरपणे वागू नका. प्रवासाचे नीट नियोजन करा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. 

मिथुन:  मनात सकारात्मक विचार राहतील. भेटीगाठी फायदेशीर ठरतील. नवीन प्रस्ताव समोर येतील. त्यातून तुमचा फायदा होईल. मात्र, सतत कार्यरत राहावे लागेल. एकाच वेळी अनेक कामे करताना तारांबळ उडेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील.

कर्क:  नोकरीत सतत व्यस्त राहाल. तुमच्या हातून मोठी जबाबदारी पार पडेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. समाजसेवेची हौस फेडाल. पण त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होईल, जवळचे लोक नाराज होतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. हाती घेतलेले काम पूर्ण कराल.

सिंह:  कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. मनात सकारात्मक विचार राहतील. त्यामुळे तुमचा कामाचा आवाका वाढेल. लोकांच्या भेटीगाठी होतील, मोठे प्रकल्प राबविण्याचे ठरविले जाईल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. 

कन्या:  नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. व्यवसायात भरभराट होईल. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. महत्वाच्या कामात सफलता मिळेल. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा.

तूळ:  महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा जास्त प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. नोकरीत एखाद्या कामासाठी वेळ द्यावा लागेल. प्रवास शक्यतो टाळा. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. इतरांच्या भानगडीत पडू नका. 

वृश्चिक:  हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमच्या कष्टाचे चीज होईल. एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. महत्त्वाचे निरोप येतील. नवीन माहिती कळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

धनु:  कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचा ठसा उमटेल. मात्र, त्यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम करावे लागतील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्याच्याशी बोलून मन मोकळे होईल.

मकर:  कामाचा ताण कमी राहील. त्यामुळे तुम्हाला फावला वेळ मिळेल. एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. हाती घेतलेले काम तडीस न्याल. काहींना अचानक जवळचा प्रवास घडून येईल.

कुंभ:  कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव पडेल. लोकाचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना चांगली संधी मिळेल. एखाद्या महागड्‌या वस्तूची खरेदी कराल. कामात सतत व्यस्त राहाल. फार अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. 

मीन:  ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मोठ्या उलाढालीत फायदा होईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोक तुमची प्रशंसा करतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही.

- विजय देशपांडे, ज्योतिषविशारद

Open in app

Web Title: today daily horoscope 04 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi