Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२२ : मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस, व्यापारवृद्धी होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 07:12 IST2022-07-30T07:11:56+5:302022-07-30T07:12:35+5:30

Todays Horoscope 30 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Rashi Bhavishya Todays Horoscope 30 July Capricorn people will have a profitable day in terms of finances business will increase zodiac sign astrology | Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२२ : मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस, व्यापारवृद्धी होईल

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२२ : मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस, व्यापारवृद्धी होईल

मेष - आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा

वृषभ - आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल. कुटुंबियांशी विशेषतः मातेशी सुसंवाद घडेल. आणखी वाचा

मिथुन - आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तेथील वातावरण चांगले राहील. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. आणखी वाचा

सिंह - आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. आणखी वाचा

तूळ - आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. आणखी वाचा

वृश्चिक - आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. आणखी वाचा

धनु -  आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.  आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा

मीन - आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे.  आणखी वाचा

Open in app

Web Title: Rashi Bhavishya Todays Horoscope 30 July Capricorn people will have a profitable day in terms of finances business will increase zodiac sign astrology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.