Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२२ : मेष राशीच्या लोकांना नवे काम हाती घेण्यास अनुकूल दिवस, धनलाभाचेही योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 07:13 IST2022-07-21T07:12:12+5:302022-07-21T07:13:14+5:30

Todays Horoscope 21 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Rashi Bhavishya Todays Horoscope 21th July 2022 Favorable day for people of Aries sign to take up new work sum of money also rashifal zodiac sign | Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२२ : मेष राशीच्या लोकांना नवे काम हाती घेण्यास अनुकूल दिवस, धनलाभाचेही योग

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२२ : मेष राशीच्या लोकांना नवे काम हाती घेण्यास अनुकूल दिवस, धनलाभाचेही योग

मेष - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील.  आणखी वाचा

वृषभ - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. त्यामुळे काही लाभ संभवतात. आणखी वाचा

कर्क - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढेल. आणखी वाचा

सिंह - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा

कन्या - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. प्रकृतीस त्रास संभवतो. आणखी वाचा

तूळ - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. आणखी वाचा

वृश्चिक - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल. आणखी वाचा

धनु - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. आणखी वाचा

मकर - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. आणखी वाचा

कुंभ - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या - पिण्यात संयम बाळगा. आणखी वाचा

मीन - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. आणखी वाचा

Web Title: Rashi Bhavishya Todays Horoscope 21th July 2022 Favorable day for people of Aries sign to take up new work sum of money also rashifal zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app