Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना परदेशातून उत्तम बातमी मिळेल, नशीबाची साथ लाभेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 07:15 IST2022-07-20T07:15:10+5:302022-07-20T07:15:58+5:30
Todays Horoscope 20 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना परदेशातून उत्तम बातमी मिळेल, नशीबाची साथ लाभेल
मेष - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण - घेवाण करू नका. आणखी वाचा
वृषभ - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. आणखी वाचा
मिथुन - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
कर्क - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोटया प्रवासामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. मित्र व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा
सिंह - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. आणखी वाचा
कन्या - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. आणखी वाचा
तूळ - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. आणखी वाचा
वृश्चिक - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा ह्यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. शक्य असेल तर प्रवास टाळा. आणखी वाचा
धनु - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावे. आणखी वाचा
मकर - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. आणखी वाचा
कुंभ - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा
मीन - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. आणखी वाचा