आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 07:56 IST2025-08-16T07:48:17+5:302025-08-16T07:56:15+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
मेष - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मात्र, दुपार नंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावे लागेल. आणखी वाचा
वृषभ - आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रां कडून लाभ होईल. आणखी वाचा
मिथुन - आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. आणखी वाचा
कर्क - आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपार नंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता ह्यामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल. आणखी वाचा
सिंह - आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. आणखी वाचा
तूळ - आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. आणखी वाचा
धनु - आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल. आणखी वाचा
मकर - आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. आणखी वाचा
कुंभ - आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. आणखी वाचा
मीन - आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. आणखी वाचा