आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:36 IST2025-09-05T07:35:42+5:302025-09-05T07:36:33+5:30
Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस

आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
मेष- कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. आणखी वाचा
वृषभ- आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा
मिथुन - बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळे मन सुन्न राहील. आणखी वाचा
कर्क - आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. आणखी वाचा
सिंह - आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा
तूळ - आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. आणखी वाचा
धनु - आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल. आणखी वाचा
मकर - आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा
कुंभ - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन - मित्र - स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. आणखी वाचा