आजचे राशीभविष्य, ३ फेब्रुवारी २०२६: आजचा दिवस शुभ फलदायी, वरिष्ठ खुश होतील, मान वाढेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 07:24 IST2026-02-03T07:24:01+5:302026-02-03T07:24:36+5:30

Daily Horoscope: वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस

daily horoscope 3 February 2026 rashi bhavishya astrology zodiac sign lovelife prediction | आजचे राशीभविष्य, ३ फेब्रुवारी २०२६: आजचा दिवस शुभ फलदायी, वरिष्ठ खुश होतील, मान वाढेल !

आजचे राशीभविष्य, ३ फेब्रुवारी २०२६: आजचा दिवस शुभ फलदायी, वरिष्ठ खुश होतील, मान वाढेल !

मेष: आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आणखी वाचा

वृषभ: वडिलांकडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल. आणखी वाचा

मिथुन: आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. आणखी वाचा

कर्क: आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. आणखी वाचा

सिंह: आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणे - वागणे संयमित ठेवावे लागेल. रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

कन्या: आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. थकवा जाणवेल. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा

धनु: आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. आणखी वाचा

मकर: आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा

कुंभ: आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारां कडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल. आणखी वाचा

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 3 फरवरी 2026: शुभ दिन, वरिष्ठ खुश!

Web Summary : राशिफल के अनुसार मिश्रित दिन। कुछ को थकान, असहमति का सामना करना पड़ सकता है, जबकि अन्य को लाभ, पहचान और खुशी मिलेगी। स्वास्थ्य और वाणी पर ध्यान दें।

Web Title : Daily Horoscope, February 3, 2026: Auspicious Day, Seniors Happy!

Web Summary : Mixed day for zodiac signs. Some may face fatigue or disagreements, while others experience gains, recognition, and happiness. Focus on health and controlled speech.