आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२६: मन प्रसन्न राहिल, अचानक धनलाभ होईल, वाणीवर संयम ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:34 IST2026-01-28T07:31:52+5:302026-01-28T07:34:16+5:30

daily horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

daily horoscope 28 January 2026 based on zodiac sign lovelife prediction career guidance | आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२६: मन प्रसन्न राहिल, अचानक धनलाभ होईल, वाणीवर संयम ठेवा!

आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२६: मन प्रसन्न राहिल, अचानक धनलाभ होईल, वाणीवर संयम ठेवा!

मेष: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील. आणखी वाचा

वृषभ: आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊ शकेल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा

मिथुन: आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. आणखी वाचा

कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आणखी वाचा

सिंह: आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. आणखी वाचा

कन्या: आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल. आणखी वाचा 

तूळ: आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकारविरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंदात व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान-सन्मान होतील. मित्र व कुटुंबियांबरोबर हिंडणे आनंददायी ठरेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मकर: निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा

कुंभ: आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मीन: आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 28 जनवरी 2026: मन प्रसन्न, अचानक धन लाभ, वाणी पर संयम!

Web Summary : आज का दिन मिलाजुला रहेगा। वृषभ राशि को धन लाभ हो सकता है। मिथुन राशि को स्वास्थ्य संबंधी परेशानियां होंगी। कर्क राशि को व्यापार में लाभ होगा। तुला राशि को अपनी वाणी पर नियंत्रण रखना होगा। वृश्चिक राशि मनोरंजन का आनंद लेंगे। मीन राशि का दिन जीवनसाथी के साथ अच्छा बीतेगा।

Web Title : Today's Horoscope, January 28, 2026: Mind Happy, Sudden Gains, Control Speech!

Web Summary : Mixed day predicted. Taurus may see financial gains. Gemini faces health issues. Cancer benefits in business. Libra needs to watch their speech. Scorpio enjoys recreation. Pisces will have a good day with their partner.