आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:36 IST2025-06-12T07:35:45+5:302025-06-12T07:36:31+5:30

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

daily horoscope 12 june 2025 astrology based on zodiac signs love life predictions | आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !

आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !

मेष: आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. आणखी वाचा

वृषभ: आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन: आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. आणखी वाचा

कर्क: आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आणखी वाचा

सिंह: आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. आणखी वाचा

कन्या: आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. आणखी वाचा

तूळ: आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. आणखी वाचा

वृश्चिक: आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. आणखी वाचा

धनु: आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

मकर: आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा

कुंभ: आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. आणखी वाचा

मीन: आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल. आणखी वाचा

Web Title: daily horoscope 12 june 2025 astrology based on zodiac signs love life predictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app