आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:36 IST2025-04-12T07:34:46+5:302025-04-12T07:36:05+5:30
Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल!
मेष- मित्र-स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा
वृषभ- वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरी सुद्धा आपली कामातील तत्परता प्रगतीस सहाय्यक होईल. आणखी वाचा
मिथुन- निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका. आणखी वाचा
कर्क- कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढतील. आणखी वाचा
सिंह- आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल. आणखी वाचा
कन्या- उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा
तूळ- सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षण प्रबळ होईल. मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा
वृश्चिक- मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. वडीलधार्यांच्या सहकार्यामुळे प्रगती करू शकाल. आणखी वाचा
धनु- मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आणखी वाचा
मकर- शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्याशी चर्चा तसेच अनावश्यक खर्चापासून दूर राहा. आणखी वाचा
कुंभ- राग व बोलण्यावर संयम ठेवा. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखी वाचा
मीन- सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आणखी वाचा