राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:43 IST2025-06-11T07:43:15+5:302025-06-11T07:43:52+5:30

daily horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

daily horoscope 11 june 2025 love prediction career guidance astrology based on zodiac sign | राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!

राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!

मेष: आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. आणखी वाचा...

वृषभ: आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा...

मिथुन: आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा...

कर्क: आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. आणखी वाचा...

सिंह: आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. आणखी वाचा...

कन्या: आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा...

तूळ: आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल. आणखी वाचा...

वृश्चिक: आज आपण तन - मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. मंगल कार्या निमित्त बाहेर जावे लागेल. आणखी वाचा...

धनु: आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. आणखी वाचा...

मकर: आजचा दिवस नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. आणखी वाचा...

कुंभ: आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. आणखी वाचा...

मीन: आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा...

Web Title: daily horoscope 11 june 2025 love prediction career guidance astrology based on zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app