आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:13 IST2025-06-08T07:09:29+5:302025-06-08T07:13:42+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Daily Horoscop 8th june 2025 Enjoy the day with friends and family | आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा

आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा

मेष

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. आणखी वाचा...

वृषभ

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा...

मिथुन

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद - विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. आणखी वाचा...

कर्क

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. आणखी वाचा....

सिंह

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. आणखी वाचा...

कन्या

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. आणखी वाचा...

तूळ

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा...

वृश्चिक

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

धनु

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. आणखी वाचा....

मकर

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपणास आनंद होईल. आणखी वाचा....

कुंभ

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा....

मीन

08 जून, 2025 रविवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. आणखी वाचा...

Web Title: Daily Horoscop 8th june 2025 Enjoy the day with friends and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app