Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre VS Prakash Yashwant Ambedkar Votes & Results Round five akola | अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  पाचव्या फेरीअखेर भाजपच्या संजय धोत्रेंची जोरदार मुसंडी; आंबेडकर, पटेल अडखळले
अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  पाचव्या फेरीअखेर भाजपच्या संजय धोत्रेंची जोरदार मुसंडी; आंबेडकर, पटेल अडखळले


अकोला : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकोल्यामध्ये पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरी अखेर त्यांनी लाखाचा आकडा पार केला असून, त्यांना १०२२८५ मतं मिळाली असून , वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात ६१४१२ मतं पडली आहेत. काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना ४५७७० मते मिळाली आहेत.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. १९८४ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने १९८९ मध्ये विजय मिळविल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीत काँग्रेसने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीकेल्यामुळे त्याना यश मिळाले. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच काँर्ग्रेसला व अ‍ॅॅड.आंबेडकरांनाही विजय मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात असलेलेच उमेदवार २०१९ मध्ये पुन्हा एकदा समोर आल्याने निकालाची पुनरावृत्ती होते की वंचित किंवा काँग्रेस चमत्कार करते याबद्दल उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकोल्यामध्ये पहिल्या फेरीनंतर संजय धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १६८२३ मतं मिळाली असून , प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात १०३८९ मतं पडली आहेत. हिदायत पटेल यांना ६७९४ मते मिळाली आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.

गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.

Web Title: Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre VS Prakash Yashwant Ambedkar Votes & Results Round five akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.