अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदी 

By सुदाम देशमुख | Updated: February 6, 2026 11:55 IST2026-02-06T11:54:26+5:302026-02-06T11:55:06+5:30

Ahilyanagar Mayor Election: अहिल्यानगर शहराच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड झाली आहे.

In Ahilyanagar, NCP's Jyoti Gade is the mayor and BJP's Dhananjay Jadhav is the deputy mayor. | अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदी 

अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदी 

अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष सभा झाली. महापौर -उपमहापौर पदासाठी एकच अर्ज असल्याने दोघांची निवड बिनविरोध झाली. अवघ्या पाचच मिनिटात सभेचे कामकाज संपले.

ज्योती गाडे या दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या मेव्हणी आहेत. धनंजय जाधव हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक आहेत. तब्बल दोन वर्षांनी महापालिकेतील प्रशासक राज अखेर संपुष्टात आले.

Web Title : अहिल्यानगर में राकांपा की ज्योति गाडे महापौर, भाजपा के धनंजय जाधव उपमहापौर

Web Summary : अहिल्यानगर में राकांपा की ज्योति गाडे महापौर और भाजपा के धनंजय जाधव उपमहापौर बने। जिलाधिकारी डॉ. पंकज आशिया की अध्यक्षता में हुई विशेष बैठक में दोनों निर्विरोध चुने गए, जिससे दो साल का प्रशासनिक शासन समाप्त हो गया।

Web Title : NCP's Jyoti Gade Mayor, BJP's Dhananjay Jadhav Deputy Mayor in Ahilyanagar

Web Summary : In Ahilyanagar, NCP's Jyoti Gade became Mayor, and BJP's Dhananjay Jadhav Deputy Mayor. Their unopposed election, overseen by District Collector Dr. Pankaj Asia, concluded a special municipal meeting in just five minutes, ending two years of administrative rule.