मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:18 PM2024-05-05T21:18:11+5:302024-05-05T21:21:57+5:30

काल 'सेंड ऑफ ' अन् आज अपघातात तरुणाचा मृत्यू, विद्यापीठावर शोककळा

A terrible accident of cargo jeep and motorcycle, mother son died on the spot | मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू

मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू

अनिल कुमार मेहेत्रे/ पैठण :पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका मालवाहू जीप व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला. समीर राजू शेख आणि मुमताज राजू शेख अशी मृत्यांची नावे आहेत. समीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागात एम ए द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. कालच त्याचा सेंड ऑफ झाला आणि आणि त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने विद्यापीठावर शोककळा पसरली आहे. 

पैठण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर राजू शेख वय 21 मुमताज राजू शेख वय 40 दोघेही राहणार लिंबे जळगाव हे रविवारी सकाळी शेवगाव येथे लग्न सोहळ्यासाठी  एका मोटरसायकलवर गेले होते. लग्न सोहळा आटोपून परत शेवगाव येथून मोटरसायकलवर आपल्या गावाकडे लिंबे जळगाव येथे जात असताना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पैठण ते छ्त्रपती संभाजीनगर रोडवर पैठण जवळ असलेल्या महेश ट्रेडर्स समोर पौर्णिमा हॉटेल जवळ एका मालवाहू पिकप जीपने मोटरसायकलला जोराची धडक दिली.

या अपघातात समीर राजू शेख वय २१  मुमताज राजू शेख वय ४० या माय लेकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पैठण पोलिसांना मिळतात पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अपघातामध्ये मरण पावलेले समीर राजू शेख व मुमताज राजू शेख यांना उतरणीय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पैठण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. सध्या तरी पैठण पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख करत आहे

विद्यापीठावर शोककळा
समीर विद्यापीठांमध्ये इतिहास विभागात एम ए द्वितीय वर्षांमध्ये शिक्षण घेत होता. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तो काम करून शिखन घेत adrm  समीर अत्यंत होतकरू मुलगा होता. रात्री आडत दुकानांमध्ये काम करून दिवसा तो शिक्षण घेत असे. कालच इतिहास विभागांमध्ये द्वितीय वर्षाच्या मुलांना सेंड ऑफ देण्यात आला यावेळी समीर खूप खुश होता त्याने खूप मस्ती केली आज सकाळी सर्वांना सेंड ऑफ चे फोटो ही त्याने सेंड केले आणि सायंकाळी त्याच्या मृत्यूची वार्ता धडकली यामुळे इतिहास विभागासह विद्यापीठावर शोककळा पसरली आहे.

Web Title: A terrible accident of cargo jeep and motorcycle, mother son died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.