Ahmednagar: फटाक्यांची ठिणगी उडाली अन् नवीकोरी कार खाक झाली

By अरुण वाघमोडे | Published: May 2, 2024 02:11 PM2024-05-02T14:11:06+5:302024-05-02T14:11:40+5:30

Car Fire In Ahmednagar: नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

Firecrackers spark and Navikori's car is destroyed | Ahmednagar: फटाक्यांची ठिणगी उडाली अन् नवीकोरी कार खाक झाली

Ahmednagar: फटाक्यांची ठिणगी उडाली अन् नवीकोरी कार खाक झाली

- अरुण वाघमोडे 
अहमदनगर - नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सांडवा फाटा येथे समाधान लॉन्सवर लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगलअष्टक पूर्ण झाल्यानंतर मंडपापासून काही अंतरावर नातेवाईकांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी केली. फटक्यांमधून उडालेल्या ठिणग्या परिसरातील वाळलेल्या गवतावर पडल्याने गवताने पेट घेतला. गवत पेटल्याची बाब निदर्शनास येण्याआधीच आगीचा हा भडका थेट जवळच उभा केलेल्या कारजवळ जाऊन पोहोचला आणि कारने पेट घेतला. उपस्थितांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, उन्हाच्या तीव्रतेने आगीने आणखी भडका घेतला आणि काही मिनिटातच ही संपूर्ण कार जळून खाक झाली. दरम्यान या कारजवळ आणखी काही वाहने उभा करण्यात आले होते. मात्र आग लागल्याचे निदर्शनास येतात तेथील वाहने तत्काळ काढून घेण्यात आली. अन्यथा अनेक वाहने आगीच्या भक्षस्थानी पडले असते.

Web Title: Firecrackers spark and Navikori's car is destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.