Satara: नवरदेवाच्या गावदेवावेळी धुमश्चक्री; १९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:01 PM2024-05-10T12:01:23+5:302024-05-10T12:01:48+5:30

कऱ्हाड : विवाहाच्या गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री उडाली. घारेवाडी, ता. कऱ्हाड येथे ही घटना घडली. ...

Clashes between two groups due to an old feud in the wedding village procession in karad | Satara: नवरदेवाच्या गावदेवावेळी धुमश्चक्री; १९ जणांवर गुन्हा

Satara: नवरदेवाच्या गावदेवावेळी धुमश्चक्री; १९ जणांवर गुन्हा

कऱ्हाड : विवाहाच्या गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री उडाली. घारेवाडी, ता. कऱ्हाड येथे ही घटना घडली. याबाबत कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरून एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिनाथ काशीनाथ घारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदराव धोंडीबा घारे, संजय धोंडीबा घारे, अक्षय आनंदराव घारे, आकाश आनंदराव घारे, प्रवीण नंदकुमार घारे, दत्तात्रय एकनाथ घारे, संगीता आनंदराव घारे, सुजाता संजय घारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भावकीतील युवकाच्या विवाहानिमित्त गावदेव करण्यासाठी गावातून मिरवणूक काढली असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून आदिनाथ घारे यांच्यासह इतरांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी धक्काबुक्की करून लोखंडी गज, लाकडी दांडके तसेच दगडाने आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीत आदिनाथ घारे, वीरेंद्र घारे, तन्मय घारे हे जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याउलट संगीता आनंदराव घारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, विलास निवृत्ती घारे, आदिनाथ काशीनाथ घारे, प्रवीण विश्वनाथ घारे, श्रीधर राजेंद्र घारे, अक्षय सुरेश घारे, तन्मय तानाजी घारे, अमर शशिकांत घारे, सचिन किसन माने, कार्तिक विकास घारे, सूरज बाबासो माने, योगेश भीमराव घारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गावदेवाच्या मिरवणुकीसाठी वाट करून देत असताना आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक फौजदार विठ्ठल खाडे तपास करीत आहेत.

Web Title: Clashes between two groups due to an old feud in the wedding village procession in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.