"मुख्यमंत्री येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही..." नातेवाईकांचा पवित्रा, बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:57 AM2024-05-10T11:57:37+5:302024-05-10T12:05:37+5:30

पिंपरीपेंढार येथील गाजरपट शिवारात राजेश प्रभाकर पडवळ यांची शेती असून या शेतात नानुबाई यांनी बाजरी केली होती...

"The body will not be taken over until the Chief Minister comes..." Relatives post, woman killed in leopard attack | "मुख्यमंत्री येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही..." नातेवाईकांचा पवित्रा, बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

"मुख्यमंत्री येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही..." नातेवाईकांचा पवित्रा, बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

पिंपरी पेंढार (पुणे) : पिंपरी पेंढार येथील गाजरपट शिवारात बाजरीच्या शेतात राखन करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला असल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या पाच दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नानुबाई सीताराम कडाळे ( वय ४५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी पेंढार येथील गाजरपट शिवारात राजेश प्रभाकर पडवळ यांची शेती असून या शेतात नानुबाई यांनी बाजरी केली होती. आज शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास बाजरीच्या शेतात राखन करत असताना बिबट्याने या महिलेवर अचानक हल्ला करुन ठार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून जोपर्यंत मुख्यमंत्री या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नानुबाई यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले.

वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपळवंडी परिसरातील लेंडेस्थळ काळवाडी काकडपट्टा या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. रविवारी (दि. ४) लेंडेस्थळ शिवारात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला केला होता. त्यामध्येही महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर बुधवारी (दि ८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळवाडी येथे एका आठ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते. या दोन्हीही घटना ताज्या असतानाच गुरूवारी ( दि ९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काकडपट्टा शिवारात बिबट्याने कालवडीवर हल्ला केला होता. 

आज शुक्रवारी ( दि १०) सकाळी पुन्हा पिंपरीपेंढार येथे बिबट्याने महिलेवर हल्ला करुन ठार केले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपळवंडी काळवाडी व पिंपरीपेंढार परिसरात सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत.

Web Title: "The body will not be taken over until the Chief Minister comes..." Relatives post, woman killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.