मराठी कलाकारांना घाटी बोलणाऱ्यांना Usha Nadkarni ने सुनावले खडेबोल | Lokmat CNX Filmy
Published: September 29, 2020 06:10 PM | Updated: September 29, 2020 06:13 PM
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधलं जातं. “घाटी लोगो को हिंदी भी नही आती”, ये क्या घाटी कपडा पहना है, उनके हिंदी को घाटी बदबू आ रही है अशा शब्दात हिणवलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उषा नाडकर्णी यांना असा अनुभव आला का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्याप तरी कुणीही आपल्याला असे म्हणालेले नाही. मराठी कलाकारांना पुरेसा आदर मिळतो मात्र आपल्याला कुणी असे म्हणाले तर मात्र मी त्या व्यक्तीचे थोबाड फोडेन…..तसंच बॉलीवूडमध्ये अमाप पैसा आहे....मात्र गुणवत्ता असूनही बॉलीवूडमध्ये पैसे पुरेसे दिले जात नाहीत अशीही खंत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बोलून दाखवली.