बंदराचा मुद्दा कोणासाठी लाभदायी? दीड लाखावर मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:22 PM2024-05-22T16:22:54+5:302024-05-22T16:23:14+5:30

हितेन नाईक - पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात २१ लाख ४८ हजार ५१४ मतदारांपैकी १३ लाख ७३ हजार २०७ ...

Who benefits from the port issue? It is alleged that the names of 150,000 voters are missing | बंदराचा मुद्दा कोणासाठी लाभदायी? दीड लाखावर मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप 

बंदराचा मुद्दा कोणासाठी लाभदायी? दीड लाखावर मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप 

हितेन नाईक -

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात २१ लाख ४८ हजार ५१४ मतदारांपैकी १३ लाख ७३ हजार २०७  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत १० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केले. १० उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत उद्धवसेनेच्या भारती कामडी, भाजपचे डॉ. हेमंत सवरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का थोडासा वाढला असला तरी दुसरीकडे मतदारांची संख्याही मागील निवडणुकीच्या तुलनेत ७५ हजार ३६९ इतकी वाढल्याने या वाढलेल्या मतदारांचा कौल ज्याच्या पारड्यात पडेल, त्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विधानसभानिहाय मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास बोईसर, नालासोपारा आणि वसई या बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यातच टक्केवारीत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. दीड लाखांच्यावर मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या बहुजन विकास आघाडीच्या आरोपामुळे अन्य मतदारसंघात त्यांच्याकडूनही तूट भरून काढण्याच्या प्रयत्नावर त्यांच्या विजयाचे गणित बसू शकते. 

जिल्ह्यात भाजपचा खासदार किंवा एकही आमदार नाही. शिंदेसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजप जिल्हाध्यक्षांसह अनेकांनी विरोध दर्शवीत स्थानिक उमेदवाराची मागणी केली. या मागणीला वरिष्ठांनी हिरवा कंदील देत गावित यांच्याऐवजी डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली. भाजपने शिंदेसेना आणि इतर घटक पक्षांच्या जोरावर डहाणू, वसई, पालघर, विक्रमगड, जव्हार या मतदारसंघात चांगला शिरकाव केल्याचे मानले जात आहे. वाढवण बंदराच्या विरोधाचा फटका किनारपट्टीवर बसेल हा अंदाज किती खरा ठरतो यावर महायुतीचे विजयाचे गणित ठरू शकते.

महाविकास आघाडीची सारी भिस्त अल्पसंख्याक, वाढवण बंदरविरोधी मतदार, आदिवासी मतदार यांच्यावर आहे. शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा, माकपचे विनोद निकोले यांनी त्यांना किती ताकद पुरवली यावरही त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.  या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एकहाती लढा दिला. 

विधानसभानिहाय मतदान 
मतदारसंघ      २०१९      २०२४ 
डहाणू    १,८१,२५९    २,०९,१००
विक्रमगड     १,८३,६५३     २,२४,८१५ 
पालघर     १,८५,९४३      १,९८,८५१ 
बोईसर    २,०४,०४८    २,४८,४०२ 
नालासोपारा     २,५४,१३०     २,९१,८१९ 
वसई     १,९२,१५३     २,००,१६०
 

Web Title: Who benefits from the port issue? It is alleged that the names of 150,000 voters are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.