वर्धा जिल्ह्यातील 'वायगाव हळदी'चा जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:33 IST2025-06-10T19:31:32+5:302025-06-10T19:33:37+5:30

Wardha : हळद प्रक्रिया, निर्यातीला मिळणार चालना, शेतकऱ्यांना होणार याचा चांगला फायदा

'Vaigaon Haldi' from Wardha district opens its way to the global market; Farmers will benefit | वर्धा जिल्ह्यातील 'वायगाव हळदी'चा जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना होणार फायदा

'Vaigaon Haldi' from Wardha district opens its way to the global market; Farmers will benefit

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
कुर्कुमीनचे सर्वाधिक प्रमाण असलेली समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळदीला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. शासन व प्रशासन स्तरावरून वायगाव हळदीचा विस्तार, प्रक्रिया व निर्यात व्यवस्था उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष केंद्रित करून वायगाव हळदीला जागतिक बाजार पेठ उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागाला प्रकल्प आराखडा निर्मिती व अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे वायगाव हळदीचा जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला होणार आहे. 


सन २०१६-१७ मध्ये या आर्थिक वर्षात वायगाव हळद उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे समभाग धारक यांच्याकडून उत्पादित केलेल्या सेंद्रिय हळदीला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत मासाला विक्री करण्यासाठी हळद प्रक्रिया ते निर्यात व्यवस्था निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत ९० टक्के अनुदानावर थेट डिबीटीद्वारे खरेदी होणार आहे.


थेट हळद उत्पादक शेतकरी शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, शेती संबंधित कार्य करणारी सहकारी संस्थ्या यांच्या स्तरावर हळद प्रक्रिया ते निर्यात व्यवस्था थेट डीबीटी पद्धतीने खरेदीबाबतचा प्रस्ताव तीन कोटी ११ लाख २४ हजार रुपये, शेतकरी उत्पादक कंपनी सदस्यांचा १० टक्के स्वहिस्ता रक्कम अशी ३१ लाख २१ हजार रुपये ९० व टक्के अनुदान हिस्सा अशा ३ कोटी ११ लाख २४ हजार रुपयांच्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे.


वायगाव हळदीला जीआय टॅग प्राप्त
सन २०१७-१५ आत्मा कार्यालय व वायगाव हळद उत्पादक संघ यांच्या प्रयत्नातून वायगाव हळदेला भौगोलिक निर्देशांक जीआय प्राप्त झाले आहे. त्यामुळे वायगाव हळदीला चांगले दिवस प्राप्त झाले आहे. भौगोलिक निर्देशांक केल्यामुळे निर्यात करण्यासाठी अडचणी दूर झालेल्या असून बहुतांश शेतकरी कुटुंबाच्या जीवनात है पिक सोनेरी दिवस दाखविणारे ठरले आहे.


ब्रिटिश काळापासून हळदीची लागवड
समुद्रपूर तालुक्यातील हळद पीक ब्रिटिश काळापासून घेतले जात आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या हळदेची जोपासना अजूनही केली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पीकवल्या जाणाऱ्या य हळदीला जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यातूनही अधिक मागणी आहे.

Web Title: 'Vaigaon Haldi' from Wardha district opens its way to the global market; Farmers will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.