ठाकरे बंधूंचे राजकारण मुंबई-ठाण्यापुरतेच; प्रताप सरनाईकांचा प्रहार, म्हणाले- 'मशाल विझली अन् धूरही संपला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:41 IST2026-01-16T10:40:37+5:302026-01-16T10:41:18+5:30
Municipal Corporation Election 2026 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

ठाकरे बंधूंचे राजकारण मुंबई-ठाण्यापुरतेच; प्रताप सरनाईकांचा प्रहार, म्हणाले- 'मशाल विझली अन् धूरही संपला!
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष ज्या निकालावर लागले आहे, तो म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर होणार आहे. एकीकडे मतमोजणी सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि गुप्त बैठकांमुळे मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
'मशाल विझली, इंजिनचा धूरही संपला' - सरनाईकांचा टोला
शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत जोरदार टोलेबाजी केली. सरनाईक म्हणाले की, "राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे तीन दिवस प्रचार केला. त्यांचे राजकारण फक्त मुंबई आणि ठाण्यापुरतेच मर्यादित आहे." पुढे बोलताना त्यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली की, "आता मशालीची ज्योत विझली आहे आणि मनसेच्या इंजिनचाही धूरही संपला आहे. महाराष्ट्रात मुंबई-ठाण्याव्यतिरिक्त २७ महापालिका आहेत, पण ठाकरे बंधूंनी उर्वरित महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे."
प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंच्या निवडणूक रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "राज्यात २७ हून अधिक महापालिका असताना ठाकरे बंधूंचे लक्ष केवळ मुंबई आणि ठाण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले. निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी गांभीर्य दाखवले नाही. केवळ शेवटचे तीन दिवस प्रचाराचे सोपस्कार पूर्ण करून आपण संपूर्ण महाराष्ट्र जिंकू शकत नाही, हे आजच्या निकालातून स्पष्ट होईल."
BMC Results 2026 LIVE: मुंबईत समाधान सरवणकर पिछाडीवर, ठाकरेंच्या निशिकांत शिंदेंची आघाडी