अखेर ठाण्यात महापौरपदासाठी भाजपाने नाव पुढे केले...! महायुतीत पेच वाढणार? अनुसूचित जातीसाठी आरक्षित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:56 IST2026-01-22T14:55:28+5:302026-01-22T14:56:12+5:30

Thane Municipal Mayor BJP Name: महापौर आरक्षण जाहीर झाले असून ठाणे महापालिकेवर आता अनुसूचित जातीचा महापौर विराजमान होणार आहे.

BJP puts forward name for Thane mayor's post...! Will the Mahayuti get into trouble? Reserved for Scheduled Castes... | अखेर ठाण्यात महापौरपदासाठी भाजपाने नाव पुढे केले...! महायुतीत पेच वाढणार? अनुसूचित जातीसाठी आरक्षित...

अखेर ठाण्यात महापौरपदासाठी भाजपाने नाव पुढे केले...! महायुतीत पेच वाढणार? अनुसूचित जातीसाठी आरक्षित...

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. हे पद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आमच्याकडे सक्षम एससी उमेदवार आहेत, त्यामुळे भाजपला किमान अडीच वर्षे महापौरपद मिळावे," अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

महापौर आरक्षण जाहीर झाले असून ठाणे महापालिकेवर आता अनुसूचित जातीचा महापौर विराजमान होणार आहे. भाजपमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून सुरेश कांबळे यांच्यासारखे अनुभवी उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्याकडे नेतृत्वाची कमतरता नाही. महापौरांना त्या पदाचा कारभार, नियम आणि शहराचे प्रश्न समजून घेण्यातच किमान एक वर्ष निघून जाते. त्यामुळे शहराच्या विकासासाठी आम्हाला पूर्ण अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळावा. नावाचा अंतिम निर्णय पक्षाची कोअर कमिटी घेईल, मात्र आमची मागणी आम्ही महायुतीच्या नेत्यांसमोर मांडली आहे, असे डावखरे म्हणाले. 

ठाण्यातील राजकीय समीकरणे:
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील अनेक वर्षांपासून येथे शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा भाजपनेही ठाण्यात आपली ताकद वाढवली असून, महापौरपदासाठी भाजपने आता मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडे 'वाटा' मागितल्याने महायुतीमध्ये जागावाटपावरून आणि पदवाटपावरून खलबते सुरू होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली होती. १३१ जागांसाठी झालेल्या या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) साठी ३५ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता महापौर पदही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हे स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिका निवडणूक शिंदे सेना आणि भाजप यांनी युतीत लढवली होती. निवडणुकीत शिंदे सेनेने ७५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौर पद त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या ९ जागांपैकी ७ जागा शिंदे सेनेकडून तर २ जागा भाजपकडून लढवण्यात आल्या होत्या.

Web Title : ठाणे महापौर पद पर भाजपा की नज़र; आरक्षण से गठबंधन में तनाव बढ़ा।

Web Summary : ठाणे में महापौर पद अनुसूचित जाति के लिए आरक्षित होने के बाद, भाजपा ने 2.5 साल के लिए पद की मांग की, सक्षम उम्मीदवारों का हवाला दिया। शिवसेना के प्रभुत्व के साथ, भाजपा का दावा गठबंधन में शक्ति-साझाकरण पर चर्चा को बढ़ावा देता है। चुनाव गतिशीलता और आरक्षित सीटें जटिलता बढ़ाती हैं।

Web Title : BJP eyes Thane Mayor post; coalition tensions rise over reservation.

Web Summary : Following Thane's mayoral reservation for SC, BJP demands the position for 2.5 years, citing capable candidates. With Shiv Sena dominating Thane, BJP's claim sparks coalition power-sharing discussions. Election dynamics and reserved seats add complexity.