'माझा होशील ना' मालिकेत होणार खलनायकाची एंट्री, पहिल्यांदाच अभिनेता साकारणार अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 01:17 PM2021-04-04T13:17:35+5:302021-04-04T13:22:32+5:30

Majha Hoshil Na Marathi Serial New Upadte: अत्यंत कपटी, बेरकी आणि क्रूर असा हा खलनायक आदित्य-सईच्या आयुष्यात संकट बनून येणार आहे.

Zee Marathi Marathi Serial Majha Hoshil Na Villain Entry Atul Parchure | 'माझा होशील ना' मालिकेत होणार खलनायकाची एंट्री, पहिल्यांदाच अभिनेता साकारणार अशी भूमिका

'माझा होशील ना' मालिकेत होणार खलनायकाची एंट्री, पहिल्यांदाच अभिनेता साकारणार अशी भूमिका

Next

'माझा होशील ना'  ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. सुरुवातीपासून रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.दिवसेंदिवस मालिका आणखी रंजक होत आहे. मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत.

 

नुकतेच मालिकेत आदित्य आणि सई लग्नबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले. लग्नानंतर मात्र सई आणि आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी घडत आहेत. नुकता यांचा संसार सुरु झाला आहे. मात्र आता  आदित्य आणि सई यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी लवकरच एक खलनायकाची एंट्री होणार आहे. मालिकेत खलनायक साकारणारा अभिनेता कोण ? याचीही उत्सुकता चांगलीच रंगत आहे. 

अत्यंत कपटी, बेरकी आणि क्रूर असा हा खलनायक आदित्य-सईच्या आयुष्यात संकट बनून येणार आहे.मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातला प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. आतापर्यंत कॉमेडी अंदाजात अतुल परचुरेला पाहिलंय, मात्र आता पहिल्यांदाच तो खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार म्हटल्यावर उत्सुकता वाढली आहे. माझा होशील ना... या मालिकेत विराजस आणि गौतमीसोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यात अतुल परचुरेची एंट्री रसिकांचे कितपत मनोरंजन करणार हे पाहणेही रंजक असणार आहे.


मालिकेचा सेट हे कलाकारांसाठी दुसरे घरच बनतं, मालिकेतील कलाकारांमध्ये इतके खेळीमेळीचे वातावणर निर्माण होते की, सगळे सणवार, वाढदिवस इथेच साजरे केले जातात. माशा होशील ना मालिकेत आणखी एक हटके गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे,   'माझा होशील ना' या मालिकेच्या सेटवरचं सर्व कलाकारांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. अगदी घराच्याप्रमाणे सगळेच सेटवर एकत्र जेवतात. घरगुती पद्धतीने सेटवर जेवण बनवलं जातं अशी कदाचित ही पहिली मालिका असावी.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Zee Marathi Marathi Serial Majha Hoshil Na Villain Entry Atul Parchure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app