स्वीट ना? फोटोतील या चिमुकल्या स्वीटूला ओळखलंत का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 08:00 AM2022-05-14T08:00:00+5:302022-05-14T08:00:06+5:30

THROWBACK: माय घन गोल गट्टू फेज, असं कॅप्शन देत, या अभिनेत्रीनं अगदी बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय.

yeu kashi tashi me nandayla fame marathi tv actress Anvita Phaltankar childhood photo goes viral | स्वीट ना? फोटोतील या चिमुकल्या स्वीटूला ओळखलंत का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री

स्वीट ना? फोटोतील या चिमुकल्या स्वीटूला ओळखलंत का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री

Next

सोशल मीडियावर सध्या सेलिब्रिटींच्या थ्रोबॅक फोटोंची धूम आहे. होय, सेलिब्रिटींचे बालपणीचे, शाळेतले, कॉलेजातले जुने फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोतील आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला ओळखणं म्हणजे मज्जाचं मज्जा. चाहते हे एन्जॉय करतात आणि असे रोज नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका टीव्हीवरच्या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. 

होय, माय घन गोल गट्टू फेज, असं कॅप्शन देत, या अभिनेत्रीनं अगदी तान्हेपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय. याशिवायही बालपणीचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. तुम्ही या स्वीट गर्लला ओळखलंत?  ही स्वीटू एका मालिकेतून घराघरात पोहोचली. अद्यापही तुम्ही हिला ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो. ही दुसरी तिसरी कुणी नसून ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम स्वीटू अर्थात अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेतून अन्विता घराघरात पोहोचली. स्वीटू आणि ओमच्या या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. मालिका आता संपलीये. पण स्वीटू प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहे.  
 अन्विता अनेकदा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात  असते. बरेचदा ती तिचे काही फोटो, डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या बालपणीचा फोटो सुद्धा ती शेअर करत असते.

 अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या ‘गर्ल्स’ या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. मात्र, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या माध्यमातून ती खºया अर्थानं प्रकाशझोतात आली.

Web Title: yeu kashi tashi me nandayla fame marathi tv actress Anvita Phaltankar childhood photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app