'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचे वारे; जय-स्नेहामध्ये निर्माण होतायेत प्रेमाचे बंध?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:37 AM2021-10-13T11:37:37+5:302021-10-13T11:38:38+5:30

Bigg Boss Marathi: कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्नेहा वाघ आणि जय दुधाणे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे.

The winds of love in the house of the ‘Big Boss’; Bonds of love are formed in Jai-Sneha? | 'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचे वारे; जय-स्नेहामध्ये निर्माण होतायेत प्रेमाचे बंध?

'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचे वारे; जय-स्नेहामध्ये निर्माण होतायेत प्रेमाचे बंध?

Next
ठळक मुद्दे'वक्त नहीं बदलता, मगर दिल बदलते हैं.. 'असं म्हणत जय त्याच्या भावना स्नेहाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.

बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात स्पर्धकांमध्ये ज्या पद्धतीने वादविवाद रंगतात. तशाच पद्धतीने काही स्पर्धकांचे प्रेम प्रकरणही चर्चेत येतात. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे(Bigg Boss Marathi) दोन पर्व पार पडले असून या दोन्ही पर्वामध्ये काही स्पर्धकांच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर आता तिसऱ्या पर्वातही अशाच दोन जोड्या त्यांच्यातील जवळीक वाढल्यामुळे चर्चेत येत आहेत.  (bigg boss marathi 3 jay and sneha relationship)

काही दिवसांपूर्वी सोनाली (sonali) आणि विशाल (vishal) यांच्यातील मैत्री चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, आता त्यांच्यानंतर आणखी एक जोडी चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यातील जवळीक प्रेक्षकांच्याही नजरेत आली असून सध्या या दोघांमध्ये मैत्रीपलिकडे नातं निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्नेहा वाघ (sneha) आणि जय (jay) दुधाणे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर जय अप्रत्यक्षपणे त्याच्या प्रेमाची कबुली देत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

'वक्त नहीं बदलता, मगर दिल बदलते हैं.. 'असं म्हणत जय त्याच्या भावना स्नेहाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे स्नेहालादेखील जयच्या भावना समजत असून ती केवळ स्मित हास्य करताना दिसत आहे.

Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा

दरम्यान, या प्रोमोमधून या दोघांचं नातं जरी स्पष्टपणे जाणवत असलं तरीदेखील नेटकऱ्यांनी स्नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी स्नेहाचा दोन वेळा संसार मोडला असून पुन्हा ती प्रेमात पडली की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळेच तिचं जोरदार ट्रोलिंग होत आहे.
 

Web Title: The winds of love in the house of the ‘Big Boss’; Bonds of love are formed in Jai-Sneha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app