ठळक मुद्देटियारा ही गायिका व अभिनेत्री आहे.

टीव्ही कपल करण शर्मा आणि टियारा यांचा संसार अखेर मोडला. होय, सोमवारी या कपलने कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. तीन वर्षांआधी करण व टियारा लग्नबंधनात अडकले होते. पण तीनच वर्षांत दोघांनीही आपआपल्या वाटा वेगळ्या केल्या.
स्पॉटबॉयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दीर्घकाळापासून दोघांमध्येही मतभेद होते. दोघांमधील वाद विकोपाला पोहोचले होते. अशात दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि आता हे कपल कायदेशीररित्या विभक्त झाले.

करण शर्माने यावर बोलण्यास नकार दिला. मी यावर काहीही बोलणार नाही, असे त्याने म्हटले. टियारानेही यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

करण व टियाराने फेब्रुवारी 2015 मध्ये साखरपुडा केला होता. 19 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. 16 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. करण हा गढवाली आहे तर टियारा ही बंगाली. त्यामुळे दोन्ही रितीरिवाजानुसार, दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या.

करण हा टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे. ये रिश्ता क्या कहलाता है, पवित्र रिश्ता, एक नई पहचान, काला टीका, बा बहू और बेबी अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. तर टियारा ही गायिका व अभिनेत्री आहे. इंडियन आइडलच्या सीझन 5 मध्ये टियारा सहभागी झाली होती. ‘आशिकी’ आणि ‘  ट्विस्ट वाला लव’ या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

Web Title: tv couple karan sharma and tiaara kar ends marriage divorced after 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.