छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचा आज वाढदिवस आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'साथ निभाना साथिया' मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून ती घराघरात पोहचली. ती बऱ्याच कालावधीपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून गायब आहे. मात्र भलेही टीव्हीवर ती साधी सोज्वळ दिसत असली तरीदेखील ती खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटव हॉट व बोल्ड फोटो शेअर करून तिने सर्वांना चांगलीच भुरळ पाडली आहे. 

देवोलीनाने काही दिवसांपूर्वी फोटोशूट केलं होतं. या फोटोंमुळे ती खूप चर्चेत आली होती.छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच देवोलीना टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून गायब असली तरी सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिच्या बोल्ड व हॉट फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतो.

'साथ निभाना साथीया' मालिकेतून वेळ मिळाल्यानंतर देबोलिनाने टेली कॅलेंडर-२०१७ साठीही खास फोटोशूट केले होते.त्यावेळीही अतिशय हॉट अंदाजात तिच्या अदा कॅमे-यात कैद झाल्या होत्या.'साथ निभाना साथीयाँ'  या मालिकेतील गोपी बहूने अल्पावधीतच रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.

 गोपी बहु या भूमिकेमुळेच देबोलिना भट्टाचार्जीचे फॅन फॉलोईंगसुद्धा  वाढला होता.त्यामुळेच की काय मालिकेच्या एका भागाच्या शूटिंगसाठी देबोलिना 90 हजार ते 1 लाख रुपये इतके मानधन घेत असल्याचेही त्यावेळी चर्चा होत्या. 


 
'साथ निभाना साथिया'नंतर देवोलीना तिची इमेज व लूक बदलण्याच्या प्रयत्नात आहे. या मालिकेत तिने सूनेपासून आजीची भूमिकादेखील साकारली होती.

आता ती पुन्हा एकदा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. मात्र ती एका चांगल्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहे.

तिला बिग बॉस सीझन १३मध्ये सहभागी होण्यासाठी विचारण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.


Web Title: TV Actress Devoleena Bhattacharjee hot photos on instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.