ठळक मुद्देआरिशफा उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरची राहणारी आहे.

स्टार प्लसवरच्या ‘वीरा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आरिशफा खान रूग्णालयात भरती आहे. आरिशफाने स्वत: ही माहिती दिली. तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तिच्या हाताला ड्रिप लागलेली दिसतेय. यावर लागलेल्या टेपवर 28 जानेवारी ही तारीख दिसतेय. अन्य एका फोटोत ती रूग्णालयाच्या बेडवर दिसतेय आणि तिचा चेहरा ब्लँकेटने झाकलेला आहे.

18 वर्षीय आरिशफाने इन्स्टास्टोरीवर फोटो पोस्ट करत, तिच्यासाठी प्रार्थना करण्याची म्हटले आहे. आरिशफाला काय झालेय, हे अद्याप कळू शकलेले नाही. पण ती रूग्णालयात आहे म्हटल्यावर चाहते अस्वस्थ झालेत. अनेकांनी ती लवकर बरी व्हावी, अशी कामना केली. आम्हा सर्वांच्या प्रार्थना तुझ्यासोबत आहेत. तू लवकर बरी होशील, असे एका चाहत्याने लिहिले.


आरिशफाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. वयाच्या नवव्या वर्षी ‘छल’ या मालिकेतून तिने डेब्यू केला होता. ‘वीर की अरदास वीरा’ या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. या मालिकेत तिने गुंजन नावाचे पात्र साकारले होते. यानंतर लोक तिला याच नावाने ओळखू लागलेत.

आरिशफाने फियर फाईल्स, उतरन, ये है मोहब्बते, गंगा, मेरी दुर्गा अशा अनेक मालिकेत काम केलेय. पापा बाय चान्स या मालिकेत तिने गुनगुनची भूमिका साकारली होती. अनेक जाहिरातीतही ती झळकली.


आरिशफा उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरची राहणारी आहे. अभिनयाशिवाय तिला डान्सचाही छंद आहे. स्वत:चे अनेक डान्स व्हिडीओ ती शेअर करत असते.

Web Title: tv actress arishifa khan admitted in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.