ठळक मुद्देबदल पाहाल तर तुम्ही चाट पडाल.

ग्लॅमरच्या जगात येताच कलाकारांचे रंग-रूप बदलते. यशाची चमक चेह-यावर दिसू लागते. इतकी की, या कलाकारांचे जुने फोटो पाहिल्यानंतर हेच का ते? असा प्रश्न पडतो. आज आम्ही टीव्ही जगतातील अशाच काही कलाकारांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

श्रेया घोषाल

बॉलिवूडची पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिच्या सुमधूर आवाजाचा प्रत्येकजण चाहता आहे. बॉलिवूडला तिने एकापेक्षा एक हिट गाणी दिलीत. स्ट्रगलच्या काळातील श्रेया आणि आजची श्रेया पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

शक्ती मोहन

शक्ती मोहन ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक बनून आली होती. आज ती बॉलिवूडची टॉप मोस्ट कोरिओग्राफर आहे. अनेक चित्रपटांतही ती झळकली आहे. आता ती इतकी बदललीय की, तुम्ही पाहून थक्क व्हाल.

रेमो डिसूजा

‘परदेस’ या चित्रपटात शाहरूखच्या मागे डान्स करणारा रेमो डिसूजा आज बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्सला आपल्या इशाºयावर नाचवतो. इतक्या वर्षांत रेमो कमालीचा बदललाय.

हिमेश रेशमिया

2005 मध्ये आपल्या गाण्यांनी धुमाकूळ घालणारा म्युझिक डायरेक्टर, सिंगर, अ‍ॅक्टर हिमेश रेशमिया याने आताश: बराच मोठा पल्ला गाठला आहे. स्वत:ला पडद्यावर आणण्यासाठी हिमेश रेशमियाने स्वत:वर अपार मेहनत घेतली. त्याच्यातील बदल पाहून तुम्हालाही हे पटेल.

कपिल शर्मा

कपिल शर्मा आज कॉमेडीचा किंग म्हणून ओळखला जातो. ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा शो जिंकल्यानंतर कपिल प्रकाशझोतात आला. तेव्हाचा कपिल आणि आत्ताचा कपिल पाहून तुम्ही थक्क व्हाल.

मनिष पॉल

टेलिव्हिजनचा टॉप मोस्ट होस्ट आणि अ‍ॅक्टर मनिष पॉल याच्यातील बदलही थक्क करणारे आहे. दिल्लीचा हा मुलगा आता बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असतो. त्याच्यातील बदलही लक्ष वेधून घेतात.

नेहा कक्कर

नेहा कक्कर हे नाव आज कोण ओळखत नाही. इंडियन आयडलमध्ये स्पर्धक बनून आलेली नेहा आज याच शोची जज आहे. बॉलिवूडची आघाडीची सिंगर आहे. तिच्यातील बदल पाहाल तर तुम्ही चाट पडाल.

Web Title: Transformation of reality show judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.