ठळक मुद्देसुप्रिया यांनी नेहमीच खूप चांगले कथानक असलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. एक प्रेक्षक म्हणून आजच्या मालिका त्यांना आवडत नाहीत तर त्या प्रेक्षकांना देखील कशा आवडतील असा प्रश्न त्यांना पडत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

छोट्या पडद्यावरची खिचडी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेला आज अनेक वर्षं झाले असले तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हॅलो हाऊ आर खाना खाके जा ना हा... हा सुप्रिया पाठक यांचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेत हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. एवढेच नव्हे तर या मालिकेत केसात नेहमीच गजरा माळणारी हंसा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. 

सुप्रिया पाठक यांनी खिचडी प्रमाणेच एक महल हो सपनो का या मालिकेत देखील काम केले होते. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी खिचडी या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण या सिझनला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद लाभला नव्हता. सुप्रिया पाठक या खूप चांगल्या अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सुप्रिया यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्या छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कधी झळकणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

सुप्रिया यांना सध्याच्या मालिकांमध्ये काम करण्यात रस नसल्याचे त्यांनी नुकतेच अका मुलाखतीत सांगितले आहे. प्रभात खबरने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या मालिका या उगाचच ताणल्या जातात असे त्यांना वाटते. सध्याच्या मालिका या आधुनिक विचारसरणीवर आधारित नसून त्यात खूपच जुन्या परंपरा, रुढी यांचा प्रभाव पाहायला मिळतोय. तसेच कथेत दम नाहीये असे त्यांना वाटते. त्यांनी नेहमीच खूप चांगले कथानक असलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. एक प्रेक्षक म्हणून आजच्या मालिका त्यांना आवडत नाहीत तर त्या प्रेक्षकांना देखील कशा आवडतील असा प्रश्न त्यांना पडत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एक महल हो सपनो का या मालिकेत त्यांनी काम केले होते. या मालिकेचे भाग देखील हजारहून अधिक झाले होते. पण या मालिकेचे कथानक कुठेच उगाचच ताणले जात नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. 


Web Title: Today's television doesn't interest me, says Khichdi actress Supriya pathak
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.