Thats why kishori shahane got emotional in big boss house | बिग बॉस मराठी 2: किशोरी शहाणे सांगतायेत, ही गोष्ट ऐकून माझी फॅमिली सुद्धा शॉक झाली होती

बिग बॉस मराठी 2: किशोरी शहाणे सांगतायेत, ही गोष्ट ऐकून माझी फॅमिली सुद्धा शॉक झाली होती

ठळक मुद्दे''माझी फॅमिली सुद्धा शॉक झाली ऐकून की मला ऑफर आली''

मराठी चित्रपटसृष्‍टीची प्रख्‍यात नर्तिका व अभिनेत्री किशोरी शहाणेने कालच्‍या 'चोर बाजार' टास्‍कनंतर सर्वांची मने जिंकली आहेत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये मोहकता व उत्‍तम अभिनय कौशल्‍यांसाठी ओळखली जाणारी किशोरी तिचे सह-स्‍पर्धक पराग कान्‍हेरे व वीणा जगतापसोबत बिग बॉस घरामध्‍ये प्रवेश करण्‍याबाबत प्रांजळपणे बोलताना दिसत आहे. तिघेही बागेमध्‍ये गप्‍पागोष्‍टी करताना दिसत आहेत. पराग किशोरीला 'बिग बॉस सीजन २'साठी विचारल्‍यानंतर तिच्‍या प्रतिक्रियेबाबत विचारतो. शहाणे लगेच प्रतिक्रिया देत म्‍हणते, ''मला मेसेज आला की, आर यू इंटरेस्‍टेड इन बीकमिंग ए कन्‍टेस्‍टण्‍ट इन बिग बॉस?, आणि मी सरप्राइज होते की मला विचारतात आहे!'' त्‍यानंतर त्या मनापासून हसताना दिसतात.  

तिच्‍या कुटुंबाची तिच्‍याबाबत असलेल्‍या काळजीविषयी ती बोलते, ''माझी फॅमिली सुद्धा शॉक झाली ऐकून की मला ऑफर आली. त्‍यांनी मला सांगितलं की इथे खूप टास्‍क्‍स असतात. पण मी स्‍पोर्टिंग्‍ली ते करायला रेडी होते, इव्‍हन त्‍यांनी मला वॉर्न सुद्धा केलं की इथे लोक इज्‍जत काढतात सगळ्यांसमोर, पाठीमागे वाईट बोलतात.''  

याबाबत वीणाला काळजी वाटते आणि ती म्‍हणते, ''आता उद्याया एपिसोड एअर झाल्‍यावर जेव्‍हा माझं आणि शिवानीचं झालेलं भांडण दिसेल आणि तुमचं रडणं दिसेल तेव्‍हा फॅमिली सुद्धा टेन्‍शनमध्‍ये येतील की इथे काय चालू आहे.'' याबाबत किशोरी प्रतिक्रिया देत म्‍हणते, ''मी काल जेन्‍यूएन्‍ली रडले ना खूप म्‍हणून मी कॅमे-याला बोलले की प्‍लीज टेल माय फॅमिली दॅट आय अॅम ओके. नाहीतर माझी फॅमिली सरळ ह्यांच्‍या ऑफिसला फोन करतील आणि सांगतील मला घरी पाठवायला, बीकॉज दे हॅव नेव्‍हर सीन मी क्राईंग.'' खरंतर, आम्‍ही आशा करतो की किशोरी या खेळामध्‍ये दूरपर्यंत जातील आणि त्‍यांच्‍या कुटुंबांकडून त्‍यांना संपूर्ण पाठिंबा मिळेल. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Thats why kishori shahane got emotional in big boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.