ठळक मुद्देअगदी अलीकडे तो ‘जात ना पुछो धर्म की’ या मालिकेत झळकला. पण त्याची एन्ट्री झाल्याच्या काहीच दिवसांत ही मालिका बंद झाली होती.

कलर्स वाहिनीवरची ‘बालिका वधू’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. चिमुकली आनंदी आणि जगदीश सिंग ही मालिकेतील दोन्ही पात्र लोकांनी डोक्यावर घेतली होती. आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौर आणि जग्याची भूमिका साकारणारा अविनाश मुखर्जी या दोघांना या मालिकेने एक वेगळी ओळख दिली.‘बालिका वधू’मध्ये एन्ट्री घेतली तेव्हा अविनाश 11 वर्षांचा होता. आता तो मोठा झाला आहे. ‘बालिका वधू’नंतर अनेक मालिकांमध्ये तो दिसला. पण याचदरम्यान त्याला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले.


काही महिन्यांपूर्वी अविनाशचे वजन प्रचंड वाढले होते. इतके की, ‘संस्कार धरोहर’ या मालिकेत काम करत असताना त्याला प्रचंड टीका सहन करावी लागली. पण अविनाशने मनावर घेतले आणि काहीच महिन्यांत त्याने वजन कमी केले. अविनाशने एक थ्रोबॅक फोटो शेअर करत, आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितले आहे. ‘हा तेव्हाचा फोटो आहे, जेव्हा माझे वजन 86 किलो होते. आजच्या डिजिटल युगात बॉडी शेमिंग कुठल्या अभिशापापेक्षा कमी नाही. पण यावर मात करणे अशक्य नाही. आयुष्यात तुम्हाला वाटेल ते बदल तुम्ही घडवू शकता,’असे त्याने लिहिले.


गेल्या काही महिन्यात अविनाशने डाएट आणि एक्सरसाईज या माध्यमातून आपले वजन कमी केले आणि तो पुन्हा एकदा आपल्या परफेक्ट लूकमध्ये परतला. अविनाश सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याचे जुने आणि आत्ताचे फोटो बघितले असता त्याच्यातील बदल चटकन डोळ्यांत भरणारा आहे.


अगदी अलीकडे तो ‘जात ना पुछो धर्म की’ या मालिकेत झळकला. पण त्याची एन्ट्री झाल्याच्या काहीच दिवसांत ही मालिका बंद झाली होती.

Web Title: Telivision balika vadhu avinash mukherjee then and now photo talks about body shaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.