'राधाकृष्ण'मध्ये तरूण खन्ना दिसणार ह्या रूपात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:30 AM2018-12-18T06:30:00+5:302018-12-18T06:30:00+5:30

अभिनेता तरूण खन्ना आता राधाकृष्ण ह्या मालिकेत सर्वांत आवडती व्यक्तिरेखा महादेवच्या रूपात दिसून येणार आहे.

As Taruna Khanna will appear in Radhakrishna | 'राधाकृष्ण'मध्ये तरूण खन्ना दिसणार ह्या रूपात

'राधाकृष्ण'मध्ये तरूण खन्ना दिसणार ह्या रूपात

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील देखणा आणि गुणी अभिनेता तरूण खन्ना आता राधाकृष्ण ह्या मालिकेत सर्वांत आवडती व्यक्तिरेखा महादेवच्या रूपात दिसून येणार आहे. महादेवच्या रूपात तरूण राधाकृष्णच्या कथेला एका वेगळ्‌या स्तरावर घेऊन जाईल. तरूणने ह्याआधी अनेक भूमिका साकारल्या असून त्यापैकी एक भगवान शंकराची होती. आता पुन्हा एकदा तो शांत पण तेजस्वी आणि शक्तीमान रूपात दिसेल.

याबद्दल तरूण म्हणाला, “मला जेव्हा महादेवच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा मी नाही म्हणूच शकलो नाही. महादेवासोबत माझे एक वेगळे असे नाते निर्माण झाले असून राधा मल्लिका सिंग आणि कृष्ण सुमेध मुदगलकर हे ह्या सेटवरील माझे लाडके आहेत. तसे इथले वातावरण खूपच छान असून राधाकृष्णच्या ह्या टीमसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
नेहमीच पौराणिक मालिकेला रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. पौराणिक मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांना प्रचंड आवडत असतात. राधा कृष्ण ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमेध मुदगलकर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे सुमेध सध्या खूपच खूश आहे. या मालिकेतील कृष्णाची भूमिका महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. ही एक संगीत मालिका असून त्यात रासलीलेच्या विविध भावना व्यक्त करताना नृत्य आणि संगीताचा वापर केला जात आहे. महादेवांना राधाकृष्णमध्ये प्रवेश करताना पाहण्यासाठी सेामवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार भारतवर ही मालिका पहावी लागेल.
 

Web Title: As Taruna Khanna will appear in Radhakrishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.