Taarak Mehta ka ooltah Chashmah Iyer aka Tanuj Mahashabde gets emotional during interview video viral | VIDEO: लोकांना फक्त बबीताजींची काळजी, माझी नाही; मुलाखतीत इमोशनल झाले अय्यर...

VIDEO: लोकांना फक्त बबीताजींची काळजी, माझी नाही; मुलाखतीत इमोशनल झाले अय्यर...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या १२ पेक्षा जास्त वर्षापासून फॅन्सचं भरभरून मनोरंजन करत आहे. प्रेक्षकही या मालिकेला तेवढाच प्रतिसाद देत आहेत. मालिकेतील एका एका भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. जेठालाल किंवा दयाबेन तेर लोकप्रिय आहेतच. यातीलच आणखी एक लोकप्रिय भूमिका म्हणजे अय्यरची भूमिका. ही भूमिका मालिकेत तनुज महाशब्दे यांनी साकारली आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ते इमोशनल झाल्याचे बघायला मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा तनुजचा हा व्हिडीओ मुलाखतीचा आहे. ज्यात ते मालिकेबाबत लोकांच्या प्रेमाबाबत बोलताना इमोशनल झाले आहेत. यात बोलताना दिसतात की, रील आणि रिअल लाईफमध्ये फार अंतर असतं. मी जेव्हाही बाहेर जातो, तेव्हा लोक विचारतात की, अय्यर भाई बबीताजी कशा आहेत? कुणीही मला हे विचारत नाही की, अय्यर भाई तुम्ही कसे आहात? हे बोलल्यावर तनुज फारच इमोशनल झाल्याचं दिसतं.

तनुज या व्हिडीओत सांगतात की, त्यांना लग्नासाठी कशाप्रकारची मुलगी हवीये. ते सांगतात की, सुंदर चेहरा नसतो तर माणसाचं मन असतं. दोघांचं मन जुळणं फार गरजेचं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अय्यरच्या भूमिकेमुळे तनुज महाशब्दे यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेपासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिलेलं नाही.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा मालिकेचं शूटींग बऱ्याच महिन्यांनी सुरू करण्यात आलं. पुन्हा एकदा ही मालिका बघून लोक खळखळून हसू लागले आहेत. पुन्हा जेठालाल प्रेक्षकांवर आपली जादू चालवत आहेत. 

हे पण वाचा :

जेठालाल ऊर्फ दिलीप जोशीने शेअर केला ३७ वर्ष जुना फोटो, ओळखणंही झालं कठिण!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...! 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taarak Mehta ka ooltah Chashmah Iyer aka Tanuj Mahashabde gets emotional during interview video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.