बागाच्या बावरीनं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका का सोडली? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:10 PM2021-07-11T16:10:13+5:302021-07-11T16:13:23+5:30

मालिकेत बावरीने बाघाच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. गलती से मिस्टेक हो गयी हा तिचा या मालिकेतील संवाद चांगलाच गाजला होता. 

taarak mehta fame monika bhadoriya aka bagha girlfriend bawri why quit show |  बागाच्या बावरीनं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका का सोडली? 

 बागाच्या बावरीनं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका का सोडली? 

googlenewsNext
ठळक मुद्देमोनिकानं तिच्या येणा-या प्रोजेक्टबद्दल माहिती देणं टाळलं. येत्या काळात प्रेक्षकांना मी नव्या सीरिजमध्ये काम करताना नक्की दिसेन, एवढंच ती म्हणाली.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही गेल्या 13 वर्षांपासून सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका. मालिकेतील अनेक चेहरे बदलले, पण मालिकेची लोकप्रियता जराही कमी झाली नाही.  जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. पण तूर्तास आम्ही बोलतोय ते मालिकेतील आणखी एका चेह-याबद्दल. होय, बागाची बावरी हिच्याबद्दल.

बावरीची व्यक्तिरेखा अभिनेत्री मोनिका भदोरिया ( Monika Bhadoriya) हिनं साकारली होती. मात्र अचानक तिनं ही मालिका सोडली. बावरीनं अचानक मालिका सोडल्यानं चाहते निराश झाले होते. मानधनावरून वाद झाल्यानं बावरीनं मालिका सोडली, अशीही चर्चा होती. आता खुद्द बावरीनं अर्थात मोनिकानं मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

मोनिकानं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सोडण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेनं मला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. अगदी जिथं जाईल तिथं मला लोक बावरी नावानं ओळखतात. इतकी लोकप्रिय मालिका का सोडली? असा प्रश्न मला अनेकजण विचारतं आहे. यावरून वेगवेगळ्या चर्चाही माझ्या कानावर येत आहेत. पण खरं सांगायचं तर मालिका सोडण्याचा निर्णय माझा स्वत:चा होता. एकाच प्रकारची दिर्घ काळ केल्यामुळे कामात तोचतोचपणा जाणवत होता. काहीही वेगळं करण्यासारखं नसल्यानं मला कंटाळा आला होता. एक कलाकार या नात्यानं मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. गंभीर भूमिका साकारायच्या आहेत. याच कारणासाठी मी मालिका सोडली.
मोनिकानं तिच्या येणा-या प्रोजेक्टबद्दल माहिती देणं टाळलं. येत्या काळात प्रेक्षकांना मी नव्या सीरिजमध्ये काम करताना नक्की दिसेन, एवढंच ती म्हणाली.
  या मालिकेत बावरीने बाघाच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. गलती से मिस्टेक हो गयी हा तिचा या मालिकेतील संवाद चांगलाच गाजला होता. 

Web Title: taarak mehta fame monika bhadoriya aka bagha girlfriend bawri why quit show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.