सहकुटुंब सहपरिवार : देव त्यांना सद्बुद्धी देवो...; अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनील बर्वेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 02:54 PM2021-11-26T14:54:29+5:302021-11-26T14:57:33+5:30

वाचा, ‘Sahkutumb Sahaparivar’ मालिकेतील वादावर काय म्हणाले Sunil Barve ?

Sunil Barve Has THIS To Say About Annapurna Vitthal’s Allegations Against Sahkutumb Sahaparivar Makers & Cast | सहकुटुंब सहपरिवार : देव त्यांना सद्बुद्धी देवो...; अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनील बर्वेंची प्रतिक्रिया

सहकुटुंब सहपरिवार : देव त्यांना सद्बुद्धी देवो...; अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनील बर्वेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

 ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahaparivar) या  मालिकेच्या सह अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल (Annapurna Vitthal) यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर धक्कादायक आरोप केलेत आणि खळबळ माजली.  मालिकेत सूर्या या मुख्य पात्राच्या आईची भूमिका साकारणा-या अन्नपूर्णा यांनी एक व्हिडीओ शेअर करत, मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक व सहकलाकार मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.  दादर पोलिस ठाण्यात निर्मात्यांविरोधात मानसिक छळ केल्याची लेखी तक्रार नोंदवली असल्याचंही त्यांनी या व्हिडीओत स्पष्ट केलं. आता या संपूर्ण प्रकरणावर आता या आरोपांवर मालिकेचे अभिनेते सुनील बर्वे  (Sunil Barve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
‘अन्नपूर्णा  विठ्ठल यांनी अचानक असे आरोप का केलेत, मला कळायला मार्ग नाही. त्यांना मालिका सोडून तीन महिने झाले असताना अचानक त्यांना व्हिडीओ का शेअर करावासा का वाटला, मला माहित नाही. देव त्यांना सुबुद्धी देवो, इतकंच मी यावर म्हणेल. यापेक्षा अधिक मला काहीही बोलायचं नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
अद्याप अन्नपूर्णा यांच्या आरोपांवर मालिकेच्या निर्मात्यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 काय आहे प्रकरण, काय आहेत अन्नपूर्णा यांचे आरोप?
 मालिकेच्या सेटवर मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत अन्नपूर्णा विठ्ठल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. अन्नपूर्णा विठ्ठल या मालिकेत सूर्या या मुख्य पात्राच्या आईची भूमिका साकारताना दिसल्या होत्या.

अन्नपूर्णा विठ्ठल यांनी शेअर केला व्हिडीओ हिंदीमध्ये असून मालिकेच्या सेटवर माझं वारंवार रॅगिंग करण्यात आलं असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मराठी कलाविश्वात अमराठी कलाकारांना टिकू दिलं जात नाही. मी गेल्या काही महिन्यांपूर्वीच सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोडली. परंतु, मला या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अशी अफवा पसरवली गेली. या मालिकेत मला मानसिक त्रास देणे, रँगिंग करणे अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. माझं रॅगिंग करण्यात सुनील बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यासारखे अनेकजण सहभागी होते. त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकंच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला,’ 
मराठी सिनेसृष्टी तुमची आहे का?   हिंदी, तेलुगू कलाकारांनी मराठी सिनेसृष्टी काम करु नये अशी तुमची मानसिकता असेल तर मग, अशी मानसिकता असलेल्यांनी हिंदी आणि तेलुगू कलाविश्वातही काम करु नये. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे, असंही त्यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.


 
दिग्दर्शकांवरही केले गंभीर आरोप

मालिकेचे दिग्दर्शक भरत गायकवाड हे कायम मला म्हातारी म्हणून हाक मारायचे तसंच सेटवरही अश्लील शिवीगाळ करायचे. इतकंच नाही तर नंदिता पाटकर यांनी मला खोलीतून बाहेर काढण्याचा कट रचला होता. नंदिता टॉयलेटदेखील अस्वच्छ ठेवत होती. मला या मालिकेदरम्यान इतका त्रास दिला की मी डिप्रेशनमध्ये गेले. अनेकदा मला धमक्या देण्यात आल्या. मला अभिनय येत नाही, उद्यापासून हिच्यासाठी संवाद लिहू नका. सहकुटुंब सहपरिवार या संपूर्ण टीमने एका आईची भूमिका साकारणा-या अभिनेत्रीला प्रचंड त्रास दिला आहे. त्यांचे कधीही चांगलं होणार नाही, असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत.
दरम्यान, अन्नपूर्णा विठ्ठल यांनी 22 नोव्हेंबर रोजी दादर पोलीस ठाण्यात मालिकेच्या निर्मात्यांविरोधात मानसिक छळ आणि मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: Sunil Barve Has THIS To Say About Annapurna Vitthal’s Allegations Against Sahkutumb Sahaparivar Makers & Cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.