इंडियन आयडलच्या सेटवर शिल्पा शेट्टीने सुरू केला योगा क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 06:50 AM2017-03-17T06:50:51+5:302017-03-17T12:20:51+5:30

शिल्पा शेट्टीच्या फिगरचे कौतुक सगळेच करतात. गरोदरपणानंतरही शिल्पाची फिगर जशीच्या तशी आहे. योगामुळेच शिल्पाची फिगर अतिशय चांगली असल्याचे आपल्या ...

Shilpa Shetty launches Yoga Class on Indian Idol Set | इंडियन आयडलच्या सेटवर शिल्पा शेट्टीने सुरू केला योगा क्लास

इंडियन आयडलच्या सेटवर शिल्पा शेट्टीने सुरू केला योगा क्लास

googlenewsNext
ल्पा शेट्टीच्या फिगरचे कौतुक सगळेच करतात. गरोदरपणानंतरही शिल्पाची फिगर जशीच्या तशी आहे. योगामुळेच शिल्पाची फिगर अतिशय चांगली असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. शिल्पा तिच्या कामात कितीही व्यग्र असली तरी ती योगासाठी वेळ काढते. शिल्पाच्या योगाच्या सीडीजदेखील बाजारात आलेल्या आहेत. ती स्वतः तर योगा करते. पण इतरांनादेखील योगा करण्याचा सल्ला देते. योगा करण्यासाठी ती तिच्या मित्रमैत्रिणींना नेहमीच प्रोत्साहन देत असते. मानसिक स्वास्थासाठीदेखील योगा अतिशय महत्त्वाचा असतो असे शिल्पा शेट्टीचे म्हणणे आहे. 
इंडियन आयडलमध्ये फराह खान, अन्नू मलिक आणि सोनू निगम परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. पण त्याचसोबत प्रत्येक भागात आपल्याला एक तरी सेलिब्रेट परीक्षक पाहायला मिळतो. शिल्पा शेट्टी नुकतीच इंडियन आयडल या कार्यक्रमात सेलिब्रेटी परीक्षक म्हणून आली होती. तिथे तिने सगल्या स्पर्धकांच्या आवाजाचे कौतुक तर केले. पण त्याचसोबत त्या सगळ्यांना योगाचे क्लासेसदेखील दिले.
शिल्पा शेट्टीने इंडियन आयडलच्या सेटवरच योगा क्लासेस सुरू केला होता. भरणी आसन आणि तदासन अशी दोन आसने तिने या कार्यक्रमाच्या स्पर्धकांना शिकवली. आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी ही दोन आसने खूप महत्त्वाची असल्याचेही तिने सांगितले. ही आसने कशाप्रकारे केली जातात हे समजावून सांगण्यासाठी तिने स्वतः ही आसने स्पर्धकांना करून दाखवली. आपल्या सगळ्यांच्या जीवनात अतिशस त्राण असून तो दूर करण्याची गरज आहे आणि तो दूर करून मन शांत करण्यासाठी आसने आपल्याला खूप मदत करतात असे तिने स्पर्धकांना सांगितले. 
शिल्पाने स्वतः तर आसने करून दाखवली. पण त्याचसोबत सगळ्या स्पर्धकांनादेखील तिच्यासोबत आसने करायला लावली. 

Web Title: Shilpa Shetty launches Yoga Class on Indian Idol Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.