'बिग बॉस'मधील या सदस्यावर नोकराने केला होता बलात्काराचा प्रयत्न, घरच्यांनी दिली ही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:39 PM2020-01-14T12:39:39+5:302020-01-14T12:40:27+5:30

बिग बॉसच्या घरातील या सदस्यावर वयाच्या तेराव्या वर्षी नोकाराने केला होता बलात्काराचा प्रयत्न

The servant had tried to rape this member of 'Bigg Boss', this was the reaction of the housemates | 'बिग बॉस'मधील या सदस्यावर नोकराने केला होता बलात्काराचा प्रयत्न, घरच्यांनी दिली ही प्रतिक्रिया

'बिग बॉस'मधील या सदस्यावर नोकराने केला होता बलात्काराचा प्रयत्न, घरच्यांनी दिली ही प्रतिक्रिया

googlenewsNext


बिग बॉसचा तेरावा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. शोमध्ये सुरू असलेली कॉन्ट्रॉव्हर्सी व ड्रामा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो आहे. नुकतेच या सीझनमधील स्पर्धक आरती सिंगने शोमध्ये धक्कादायक खुलासा केला होता. ती म्हणाली की, वयाच्या तेराव्या वर्षी तिच्यावर घरातल्या नोकराने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. खूप प्रतिकार करून तिने स्वतःचा बचाव केला होता. हे ऐकून घरातले सगळेच हैराण झाले होते.


आरतीने तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बिग बॉसच्या घरात सांगितलेलं ऐकून तिची वहिनी कश्मीरा शाह हैराण झाली. ती म्हणाली की, मला याबद्दल माहित नव्हते. तसेच आरतीचा भाऊ कृष्णाला देखील हे माहित नव्हते. जर आरतीने तिला व कृष्णाला याबद्दल सांगितलं असतं तर आरतीसोबत वाईट कृत्य करणाऱ्या त्या माणसाला सोडले नसते. 


बिग बॉसच्या घरात छपाकची टीम आली होती. त्यावेळी आरतीने तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले होते. त्यावेळी आरती म्हणाली की, वयाच्या तेराव्या वर्षी माझ्यावर नोकराने रेप करण्याचा प्रयत्न केला होता. मी ही गोष्ट पारससोबत शेअर करायची होती. कारण मला तो खूप संवेदनशीन वाटत होता.

मी पारसला म्हटले होते की , मी एकटी झोपू शकत नाही आणि जेव्हा कधी झोपते तेव्हा दरवाजा बंद करून झोपते. हे सांगतानादेखील माझे हात थरथरत आहे. मी या प्लॅटफॉर्मवर सांगते आहे कारण हा शो बऱ्याच मुली पाहतात आणि त्यांना यातून शिकवण मिळेल की त्यांच्यासोबत असं काही घडलं तर आवाज उठविला पाहिजे.

Web Title: The servant had tried to rape this member of 'Bigg Boss', this was the reaction of the housemates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.