कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून सरकारने लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे मालिका व सिनेमांचे शूटिंग थांबले होते. मात्र आता तब्बल तीन महिन्यानंतर नव्या नियमांसोबत शूटिंगला सुरूवात झाली आहे. शूटिंग न झाल्यामुळे मालिकांचे प्रसारण थांबले होते. त्यामुळे प्रेक्षक मालिकांना खूप मिस करत होते. जवळपास तीन महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात झाल्याने छोट्या पडद्यावरील कलाकारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे.

झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्रामवर अग्गंबाई सासूबाई मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटले की, सासू झाली आई आता बबड्याची खैर नाही. "अग्गंबाई सासूबाई" १३ जुलैपासून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.


काही दिवसांपूर्वी मालिकेतील बबड्या म्हणजेच आशुतोष पत्कीने सेटवरील फोटो शेअर करत लिहिले की, लवकरच येतोय पुढची गोष्ट घेऊन. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात!”. या फोटोत तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ व आशुतोष पत्की दिसतोय.



‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. तर आशुतोष बाबड्या उर्फ ‘सोहम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

अल्पावधीच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आता या मालिकेचे नवीन एपिसोड १३ जुलैपासून प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In the series 'Aggabai Sasubai', Babadya is no longer well, because mother-in-law has become a mother, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.