'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नवं वळण, नेत्राचं बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:25 IST2022-11-23T14:21:16+5:302022-11-23T14:25:35+5:30

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबातून बाहेर काढण्यात रुपाली यशस्वी होते, पण..

Satvya Mulichi Satavi Mulagi marathi serial episodic | 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नवं वळण, नेत्राचं बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार!

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नवं वळण, नेत्राचं बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार!

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. यात अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) मुख्य भूमिकेत झळतेय.  नेत्रा ही गावातील एक सामान्य मुलगी. पण तिला असामान्य देणगी मिळाली असते. या नेत्राला त्रिनयना या देवीने भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलेलं असतं. नेत्रा दिव्यशक्तीच्या आधारे भविष्य पाहू शकते. आता ही मालिका  एका रोमांचक वळणावर आहे.

अद्वैतवर  हल्ला होतो, हे नेत्रा शेखरला सांगते त्यामुळे अद्वैतचा जीव वाचतो. शेखर नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबात परत आणतो आणि नेत्राची खरी ओळख सगळ्यांना सांगतो. अशा प्रकारे, सगळ्यांना समजतं की नेत्रा ही अव्दैतचं रक्षण करण्यासाठी या घरात आलेली आहे. 

आता नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबातून बाहेर काढण्यात रुपाली यशस्वी होते, त्यामुळे नेत्रा तिच्या घरी परत जाते. अद्वैतवर  हल्ला होतो, हे नेत्रा शेखरला सांगते त्यामुळे अद्वैतचा जीव वाचतो. शेखर नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबात परत आणतो आणि नेत्राची खरी ओळख सगळ्यांना सांगतो. अशा प्रकारे, सगळ्यांना समजतं की नेत्रा ही अव्दैतचं रक्षण करण्यासाठी या घरात आलेली आहे. अद्वैत यावर विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे, नेत्रा आणि रुपाली एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांना आव्हान देतात. नेत्रा रुपालीला अद्वैतच्या आईच्या रूपात दिसल्याचा भास होतो. आता नेत्राचं हे बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार का? हे पाहणे रोमांचक असणार आहे.

 

Web Title: Satvya Mulichi Satavi Mulagi marathi serial episodic