ठळक मुद्देमी लवकरच लग्न करणार असल्याचे तिने सांगितले. तिचे हे उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्जुनने यावर लगेचच तो भाग्यवान कोण आहे असे तिला विचारले त्यावर मी कोणाशी लग्न करतेय हे लवकरच सगळ्यांना कळेल असे ती म्हणाली.

बिदाई या मालिकेद्वारे सारा खानने तिच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेतील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर ती बिग बॉसच्या घरात झळकली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान तिने ये रिश्ता क्या कहलाता है फेम अली मर्चंट सोबत लग्न केले होते. बिग बॉसच्या घरात लग्न करणारे ते पहिले कपल ठरले होते. पण काहीच दिवसांत त्यांच्यात दुरावा आला आणि लग्नाच्या केवळ दोन महिन्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

सारा आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असून ती कोणासोबत लग्न करतेय हे तिने नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितले आहे. सारा नुकतीच किचन चॅम्पियन या कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमात तिची बहीण आर्या खान तिच्यासोबत होती. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हा इश्क में मारजवाँ फेम अर्जुन बिजलानी असून त्याने या कार्यक्रमाच्या दरम्यान साराला अनेक प्रश्न विचारून भांबावून सोडले होते. या भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या कार्यक्रमाच्या दरम्यान लग्न करण्याचा तू विचार करत आहेस का असे तिला अर्जुनने विचारले असता मी लवकरच लग्न करणार असल्याचे तिने सांगितले. तिचे हे उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्जुनने यावर लगेचच तो भाग्यवान कोण आहे असे तिला विचारले त्यावर मी कोणाशी लग्न करतेय हे लवकरच सगळ्यांना कळेल असे ती म्हणाली. त्यावर तू त्याच्याविषयी अजून काही सांगू शकतेस का असे अर्जुनने विचारल्यावर तो एक अभिनेता होता. पण आता त्याने अभिनय सोडून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. अर्जुनने त्या मुलाच्या नावाचे आद्याक्षर विचारले असता त्याचे नाव अ पासून सुरू होते असे सगळ्यांना सांगितले. 

साराने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अ पासून सुरू होतेय हे सांगितल्यावर सोशल मीडियावर हा मुलगा अंकित गेरा आहे का असा तर्क सोशल मीडियावर लावला जात आहे. कारण सारा आणि अलीच्या अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. पण त्यावेळी आमच्यात मैत्रीशिवाय काहीच नाहीये असे साराने मीडियाशी बोलताना सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sara khan will marry ankit gera?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.