सना खान आपल्या वैवाहिक जीवनाचे फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच सनाने सूरतमध्ये मुफ्ती अनस सईदसोबत झालं होतं. यानंतर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सनाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पतीसोबत 'आयतुल कुरसी' म्हणताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'याने तुमचा वाईट नजरेपासून बचाव होतो'.

दोघांनी काढली एकमेकांची नजर

या व्हिडीओत सना आणि तिचा पती अनस एकमेकांचा हात हातात घेऊन आहेत आणि 'आयतुल कुरसी' म्हणत आहेत. सनाने लिहिले की, तुम्हाला वाईट नजरांपासून वाचवतो. नमाजनंतर आणि जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा हे म्हणा. नेहमी आपला जोडीदार घराबाहेर निघताना हे म्हणा. या पोस्टवर सनाचा पती अनसने हार्ट इमोजी कमेंट केली आहे.

याआधी सना खानने पोस्ट केलं होतं की, तिने विचारही केला नव्हता की, हलाल प्रेम इतकंही सुंदर असू शकतं. तिने लिहिलं होतं की, प्रत्येक हलाल कमात समृद्धी असते. तसेच सनाच्या पतीने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली होती. यात त्याने सनासोबतचा फोटो शेअर केला होता आणि तिला आयुष्यात येण्यासाठी धन्यवाद दिले होते.

सना आणि अनसने गेल्या २० नोव्हेंबरला लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ मीडियात समोर आल्यावर सनाने इन्स्टाग्रामवर लग्नाची घोषणा केली होती. सना सलमान खानसोबत 'जय हो'सहीत इतरही अनेक सिनेमात दिसली आहे. ती 'बिग बॉस', 'फिअर फॅक्टर' आणि 'झलक दिखला जा'मध्ये दिसली आहे. काही दिवसांपूर्वी सनाने ग्लॅमर वर्ल्ड सोडलं आहे. हे तिने धर्मासाठी केल्याचं तिने सांगितलं होतं.
 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sana Khan and husband Anas Sayied recite Ayatul kursi to be safe from evil eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.