शाहरुख खानच्या 'या' सिनेमातील लूकमध्ये दिसला रेहान रॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 06:30 AM2019-02-17T06:30:00+5:302019-02-17T06:30:00+5:30

दर आठवड्‌याला झी टीव्हीवरील ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’मधील प्लॉटमध्ये अनेक वळणे येतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे औत्सुक्य वाढतच जाते

Rehman Roy is seen in Shahrukh Khan's 'Lukas' | शाहरुख खानच्या 'या' सिनेमातील लूकमध्ये दिसला रेहान रॉय

शाहरुख खानच्या 'या' सिनेमातील लूकमध्ये दिसला रेहान रॉय

googlenewsNext
ठळक मुद्देरेहान आपल्या लूकसाठी बॉलिवूडचा किंग शाहरूख खानच्या लूकवरून प्रेरणा घेतली

दर आठवड्‌याला झी टीव्हीवरील ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’मधील प्लॉटमध्ये अनेक वळणे येतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे औत्सुक्य वाढतच जाते. ह्या शोमधील कलाकार आपल्या लूकसोबत अनेक प्रयोग करण्यासाठी मानले जातात, इन्स्पेक्टर पर्वच्या रूपातील अभिनेता रेहान रॉय खास व्हॅलेन्टाईन्स डेसाठी आपला लूक पूर्णपणे बदलेल होता. रेहान आपल्या लूकसाठी बॉलिवूड किंग ऑफ रोमांस शाहरूख खानच्या लूकवरून प्रेरणा घेतली. 

शोमध्ये जिंदाल हाऊसमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे - बॉलिवूड थीम पार्टी आयोजित करण्यात आली होती. शाहरूखच्या डर चित्रपटातील राहुलच्या व्यक्तिरेखेप्रमाणे लूक करण्यात आला होता. रेहानने मल्टिकलर शर्ट आणि ब्लॅक पॅंट परिधान केले होते. असाच वेश शाहरूखने डर चित्रपटात तू मेरे सामने ह्या गाण्यामध्ये परिधान केला होता. रेहान म्हणाला, “शाहरूख खान हा बॉलिवूड किंग असून त्याने आपल्या विभिन्न व्यक्तिरेखांमधून प्रणयाचा खरा अर्थ आपल्याला समजावला. त्याचा चित्रपट डरमधील त्याचा लूक मला घेता आला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. मी ह्या लूकला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि आशा करतो की प्रेक्षकांना हा नवीन टि्‌वस्ट आवडेल.”


 

Web Title: Rehman Roy is seen in Shahrukh Khan's 'Lukas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.