छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत सुशल्याची भूमिका साकारून अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी घराघरात पोहचली. ही तिची पहिलीच मालिका होती. पण पहिल्याच मालिकेतून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसेच ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातही सहभागी झाली होती. परंतु टास्क दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ऋतुजाला शो अर्धवटच सोडून जावा लागला होता.

सध्या ती कोणत्या मालिकेत काम करताना दिसत नाही. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून त्यावर तिने शेअर केलेले फोटो पाहून पटकन तिला ओळखताही येत नाही आहे.

ऋतुजा धर्माधिकारी हिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्यात खूप बदल झालेला पहायला मिळतो आहे. ती खूप बारीक झाली असल्यामुळे तिला ओळखणं कठीण झालं आहे. 


ऋतुजा मुळची औरंगाबादची आहे. तिला अभिनय क्षेत्राची लहानपणापासून आवड होती. डान्सचंही वेड होतं. बारावीनंतर तर शिक्षणातला रस उडाला आणि अभिनय क्षेत्रात येण्याचं पक्कं केलं. अभिनय क्षेत्रात येण्याचा निश्चय तिचा ठाम होता आणि संघर्षाला सुरुवात झाली. पुण्यामध्ये 'एमए इन ड्रामा'साठी प्रवेश घेतला. त्याचवेळी ऑडिशनसाठी मुंबईत यावं लागत होतं. मग एका दिवसात पुणे-मुंबई - पुणे असा धकाधकीचा प्रवास सुरू झाला.

सकाळी ऑडिशनसाठी मुंबईला येऊन पुन्हा पुण्यात जावं लागत होतं. पण, या काळात आई-वडिलांकडे मदत मागू शकत नव्हते. त्यांनी फ्रीडम दिले होते. पण, त्याच दरम्यान आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आला. 


'रात्रीस खेळ चाले'मध्ये भूमिका मिळाली. या मालिकामुळे ऋतुजाला तिच्या नावानं नसलं तरी तिनं साकारलेल्या भूमिकेच्या नावानं लोक ओळखू लागले. हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.   


त्यानंतर ऋतुजा बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात पहायला मिळाली. या शोमध्ये टास्कमधील तिच्या आक्रमक कामगिरी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ती प्रसिद्ध होती.

तसेच पर्वाची विजेतेपदाची प्रमुख दावेदार म्हणून तिच्याकडे पहिले जात होते, परंतु टास्क दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ऋतुजाला शो अर्धवटच सोडून जावा लागला होता.


Web Title: Ratris Khel Chaale 2 Sushalya Aka Rutuja Dharmadhikari looking too much different
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.