रामायणातील लव-कुशच्या भूमिकेतून लोकप्रिय झाले होते हे बालकलाकर, आता करतात हे काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 08:00 AM2020-04-18T08:00:00+5:302020-04-18T08:00:00+5:30

रामायणातील लव कुश यांच्यापैकी एक अभिनेता आहे तर दुसरा कंपनीचा सीईओ

Ramamand Sagar Ramayan Swapnil Joshi Mayuresh Kshetramade Played Luv Kush Know About Him TJL | रामायणातील लव-कुशच्या भूमिकेतून लोकप्रिय झाले होते हे बालकलाकर, आता करतात हे काम 

रामायणातील लव-कुशच्या भूमिकेतून लोकप्रिय झाले होते हे बालकलाकर, आता करतात हे काम 

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सिनेसृष्टीही बंद असल्यामुळे शूटिंग होत नाही. यामुळे टेलिव्हिजनवर दाखवण्यासाठी डेली एपिसोड नसल्यामुळे जुन्या एव्हरग्रीन मालिका पुन्हा प्रसारीत केल्या जात आहेत. त्यातील लोकप्रिय मालिका म्हणजे रामायण. ऐंशीच्या दशकात ज्यावेळी रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सुरू झाली होती तेव्हा लोक हातातील सगळी कामे बाजूला ठेवून शेजारांच्या टीव्हीवर मालिका पाहण्यासाठी जात होते. सकाळी 9 वाजता सर्व गल्ली सामसूम होत होत्या. पाहिलं तर आज लॉकडाउनमुळे सगळीकडे सामसूम झालं आहे. रामायणमधील लव कुश हे पात्रदेखील लोकप्रिय झाले होते. 

रामायणातील उर्वरित पात्रांप्रमाणेच या कार्यक्रमात लव-कुशची भूमिका साकारणारी तत्कालीन बाल कलाकारही मोठी झाली आहेत. ही भूमिका दोन मराठी मुलांनी केली होती.


रामायणात लव आणि कुश यांच्या भूमिका अभिनेता स्वप्नील जोशी आणि मयुरेश क्षत्रदे यांनी साकारल्या होत्या. रामायणाला बराच काळ झाला आहे. पण या दोघांपैकी एक आज मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेता आहे. तर दुसरा न्यू जर्सीमध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत आहे.


स्वप्निल जोशीने अनेक लोकप्रिय चित्रपट केले आहेत. तर कुशची भूमिका साकारणारा महेश परदेशात राहतो. मयुरेश एका खासगी कंपनीत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात.


यापूर्वी त्याने याच क्षेत्रातील काही नामांकित कंपन्यांसाठी व्यवस्थापकीय संचालकपद भूषवले आहे. तो एक अद्भुत लेखक देखील आहे आणि “स्पाय अँड डेव्हलपमेंट” हे पुस्तक त्यांनी इतर दोन परदेशी लेखकांसोबत मिळून लिहिले आहे.

Web Title: Ramamand Sagar Ramayan Swapnil Joshi Mayuresh Kshetramade Played Luv Kush Know About Him TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.