Raju Srivastav makes fun of Bharti Singh, Harsh Limbachiya NCB drug probe watch video | राजू श्रीवास्तवने ड्रग्सवरून उडवली भारती सिंहची खिल्ली, म्हणाला - लल्ली निघाली टल्ली....

राजू श्रीवास्तवने ड्रग्सवरून उडवली भारती सिंहची खिल्ली, म्हणाला - लल्ली निघाली टल्ली....

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बचियाला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या किला कोर्टाने ड्रग्स प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र, भारती आणि हर्षचं नाव ड्रग्समध्ये समोर आल्याने दोघांची इंडस्ट्रीत चर्चा होऊ लागली आहे. इंडस्ट्रीतील काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत तर काही गप्प आहेत. एक व्यक्ती भारतीबाबत सतत बोलत आहे. ती म्हणजे कॉमेडिअन राजू श्रीवास्तव.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचा विजेता राजू श्रीवास्तवला भलेही आजही जनरेशन ओळखत नसेल, पण काही वर्षांपूर्वी त्याची खूप चर्चा होती. राजूने भारतीच्या ड्रग्स घेण्यावरून चांगला राग व्यक्त केलाय आणि आता तो भारतीची खिल्ली उडवताना दिसत आहे. (भारती सिंहच्या अटकेवर बोलले जॉनी लिव्हर, म्हणाले - बाहेर आल्यावर एक काम करा.....)

राजू श्रीवास्तवने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो भारती सिंहची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या व्हिडीओत राजू भारतीबाबत बोलतो आहे की 'लल्ली टल्ली हो गयी. उसे टल्ली नहीं होना चाहीए था'.

राजू म्हणाला की, भारतीचा कोणताही शो बघा त्यात ती हजरजबाबी आहे. पण एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे भारती देऊ शकली नाही. लोकांनी इतकं प्रेम दिलं तो नशा कमी होता का? जो तू ही नशा केली. भारतीला जर समस्या होती तर तिने योग करायला हवा होता.

याआधी राजू आजतकसोबत बोलताना म्हणाला होता की, 'मला अजिबात विश्वास बसत नाहीये. माझ्यासाठी हे फार शॉकिंग आहे. हे काय होत आहे बॉलिवूडसोबत. आणि कलाकार का अशाप्रकारे वागत आहेत.  आधी मला वाटलं होतं की, तपासाला वेगळं वळण देण्यासाठी कुणीतरी भारती आणि हर्षचं नाव घेतलं असेल. पण आता समजलं की, दोघांनीही ही बाब मान्य केली आहे आणि त्यांच्या घरता गांजाही सापडला आहे'.

राजू पुढे म्हणाला की, 'हे सगळं घेण्याची गरज काय आहे? विना ड्रग्स, विना नशा करता कॉमेडी होत नाही का? मी भारतीसोबत खूप काम केलं आहे. तिच्या लग्नातही गेलो होतो. डान्स सुरू होता. कॉमेडी सुरू होती. पण याकडे माझं लक्ष गेलं नाही की, कसे हे लोक इतका डान्स आणि कॉमेडी करत आहे. मला वाटलं होतं की लग्नाच्या जोशमध्ये रात्रभर डान्स करत असतील. एनर्जी येत असेल. पण आता समजलं की काय सुरू होतं'.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raju Srivastav makes fun of Bharti Singh, Harsh Limbachiya NCB drug probe watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.