भारती सिंहच्या अटकेवर बोलले जॉनी लिव्हर, म्हणाले - बाहेर आल्यावर एक काम करा.....

By अमित इंगोले | Published: November 23, 2020 12:39 PM2020-11-23T12:39:11+5:302020-11-23T12:46:32+5:30

भारती आणि तिच्या पतील ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भारती सिंहला कल्याण तुरुंगात शिफ्ट केलंय तर हर्षला तळोजा तुरूंगात.

टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडीअन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बचिया चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दोघांनाही एनसीबीने ड्रग्स प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर दोघांनाही मुंबईच्या किला कोर्टने ड्रग्स प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनी जामीनासाठी अर्जही केला आहे.

भारती आणि तिच्या पतील ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भारती सिंहला कल्याण तुरुंगात शिफ्ट केलंय तर हर्षला तळोजा तुरूंगात. ही ड्रग्स केस असल्याने बेल याचिका किला कोर्टात दाखल होईल. आज(सोमवारी) दोघांच्याही जामीनावर सुनावणी होईल.

भारती सिंहच्या ड्रग्स केसमध्ये फसल्यानंतर कॉमेडिअनबाबत इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू आहे. कॉमेडिअन राजू श्रीवास्तवने भारतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता अभिनेता जॉनी लिव्हरने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या अटकेवर आणि ड्रग्सच्या सेवनावर प्रतिक्रिया दिली आहे. सोबत त्यांनी एक अपीलही केली आहे.

जॉनी लिव्हर यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले की, 'मला भारती आणि हर्षला केवळ एकच सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा सोबत काम करणाऱ्या छोट्या-मोठ्या आर्टीस्टना विनंती करा की, त्यांनी ड्रग्स घेऊ नये'.

ते पुढे म्हणाले की, 'संजय दत्तला बघा. त्याने जगासमोर कबूल केलं आहे की, तो ड्रग्स घेत होता आणि कशाप्रकारे यातून बाहेर पडला. यापेक्षा मोठं आणखी काय उदाहरण असू शकतं? आपली चूक स्वीकारा आणि ड्रग्स सोडण्याची शपथ घ्या. या केससाठी तुम्हाला कुणीही फुलाचा गुलदस्ता देण्यासाठी येणार नाही'.

जॉनी लिव्हर म्हणाले की, आता ड्रग्स सेवन तसंच झालं आहे जसं आधी दारूचं होत होतं. दारू फारच सहजपणे मिळते आणि खूप पार्टीज होतात. मी सुद्धा दारू पिण्याची चूक केली आहे. पण आता मला जाणीव झाली आहे की, दारू माझ्या टॅलेंटला आणि क्रिएटीव्हीटिला खराब करत आहे. त्यामुळे मी पिणं सोडलंय'.

ड्रग्सबाबत जॉनी म्हणाले की, 'आजच्या काळात क्रिएटीव्ह लोकांनी ड्रग्स घेणं फार पुढे गेलं आहे. आणि जर तुम्ही ड्रग्स घेताना पकडले गेलात तर विचार करा तुमच्या परिवारातील लोकांना काय वाटेल. जर हा ड्रग्स घेण्याचा सिलसिला असाच सुरू राहिला तर संपूर्ण इंडस्ट्री खराब होईल'.

ते पुढे म्हणाले की, त्यामुळेच ते विद्यार्थ्यांना सांगतात की, त्यांनी ड्रग्सपासून दूर रहावं. कारण तुरूंगात जावं लागेल आणि तुरूंग आपल्यासारख्या क्रिएटीव्ह लोकांसाठी चांगली जागा नाही. ड्रग्स घेणं कमजोरीची निशाणी आहे आणि याने तुमचं आरोग्य व नाव खराब होतं. याने करिअर संपतं.

जॉनी यांनी त्यांचा दारूचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, जेव्हा सिंगिंग डुओ कल्याणजी-आनंदजी यांच्यापैकी कल्याणजी यांना समजलं की, मी दारू पितो तेव्हा ते मला म्हणाले की, जॉनी भाई दारू पिऊ नकोस. टॅलेंटमध्ये इतकी नशा आहे ती पी.

Read in English