गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:34 AM2021-10-15T11:34:46+5:302021-10-15T11:38:07+5:30

Rahul Vaidya Song Controversy : राहुल वैद्य याला बरेच धमकीचे मेसेज येत आहेत. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फोनवर काही लोक राहुल वैद्यकडे 'गरबे की रात' गाण्यातून मोगल मां चं नाव काढण्यास सांगत आहेत.

Rahul Vaidya getting death threats for his latest song garbe ki raat | गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण...

गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण...

Next

बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मध्ये दिसलेला गायक राहुल वैद्य आपलं नवरात्री स्पेशल गाणं 'गरबे की रात' (Garbe Ki Raat song) रिलीज केलं, जे फार चर्चेत आहे. हे गाणं राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि निया शर्मा (Nia Sharma) वर शूट करण्यात आलं आहे. पण याच गाण्यामुळे राहुल वैद्य अडचणीत सापडला आहे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या गाण्यात 'श्री मोगल मां' (Shri Mogal Maa) चा उल्लेख आहे. या देवीला गुजरातमध्ये पूजलं जातं. पण गाण्यातत मोगल मां चा उल्लेख काही भक्तांना अजिबात आवडला नाही.

याच कारणाने राहुल वैद्य याला बरेच धमकीचे मेसेज येत आहेत. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फोनवर काही लोक राहुल वैद्यकडे 'गरबे की रात' गाण्यातून मोगल मां चं नाव काढण्यास सांगत आहेत. तर काही लोक या गाण्यावर बॅन लावण्याची मागणी करत आहेत. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राहुल वैद्यच्या प्रवक्त्याने सांगितलं की, 'होय, हे खरं आहे. गेल्या रात्रीपासून भरपूर फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत. ज्यात राहुलला मारण्याबाबत, जीवे मारण्याबाबत, त्याला अटक करण्याबाबत, गुन्हा दाखल करण्याबाबत बोलत आहेत. आम्हाला हे सांगायचं आहे की, गाण्यात आम्ही मोगल मा चा उल्लेख फार सन्मान आणि श्रद्धेसोबत केला आहे. आम्ही कुणच्याही भावना दुखावल्या नाहीत. पण तरी जर काही लोकांना हे आवडलं नसेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करू'.

ते म्हणाले की, 'ज्याना या गाण्यातील मोगल देवीच्या नावावर आक्षेप घेतला, त्यांना आम्ही विनंती करतो की, आम्हाला काही वेळ द्या. ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही गाणं रिलीज केलं आहे. त्यावरही ही चूक सुधारण्यास काही दिवस लागतील. आम्ही त्या सर्वांच्या भावना आणि चिंतेचा सन्मान करतो. आम्ही झालेली चूक सुधारण्याचं काम करत आहोत'.
 

Web Title: Rahul Vaidya getting death threats for his latest song garbe ki raat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app